मंचर प्रतिनिधी:
नाशिक येथील कलाकुंज 24 तास न्यूज चॅनेल तसेच द. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्कार देऊन कालिदास कला मंदिर नाट्यगृह नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री मा भारती ताई पवार व सिने अभिनेत्री स्मिता प्रभू हे होते. संपादक डॉ. महेंद्र देशपांडे,माननीय दीपक रत्नाकर दीक्षित(आचार्य गणू महाराज प,ग्राम पुरोहित)मा सुनील पाटील (नायब पोलीस अधीक्षक),डॉक्टर राज नगरकर (कर्करोग तज्ञ), प्रा. डॉ.शोभाताई सातभाई (ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेविका), सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंचरच्या जागृती महाजन यांनी गेल्या 14 वर्षांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल येथे कार्यरत असताना. अध्यापन काळात त्यांच्या विषयाचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल , तालुकास्तर तसेच जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त नाटिकांचे लेखन, दिग्दर्शन,राबविलेले समाज उपयोगी उपक्रम, शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, शब्दांकुर काव्यसंग्रहाचे लेखन, तालुक्यातील पहिली महिला निवेदिका, सामाजिक व राजकीय क्षेत्रात असणारे योगदान. आंबेगाव वार्ता वृत्त निवेदिका तसेच कोरोना काळात 'शोध उत्कृष्ट अध्यापकाचा 'या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त, विद्यार्थ्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध या सर्व मुद्द्यांचा विचार करून. कलाकुंज सन्मान सोहळा 2023 मध्ये जागृती महाजन.यांना राष्ट्रीय कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र् देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.