मंचर प्रतिनिधी:
विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी-मातृशक्ती आंबेगाव तालुका(मंचर प्रखंड) यांच्या वतीने 31 ऑगस्ट 2023 रोजी आंबेगाव तालुक्यात रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. मातृशक्तीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजिका अँड. मृणालिणी पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मंचर, उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला. ज्या-ज्या वेळी कुठलही संकट जगावर आपल्या देशावर आणि राज्यावर येत अशा वेळी खर्या अर्थाने पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभाग कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी हे पुढे येऊन काम करतात.
नागरीकांना मदत करतात, तहान-भूक, दिवस-रात्र न पाहता हे सर्वजण आपले कर्तव्य बजावत असतात. या सर्वांसोबत रक्षाबंधन साजरी करणे ही एक वेगळीच बाब या निमित्ताने ठरली. या उत्सवावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून धन्यवाद दिले. मंचर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील सर्व डॉक्टर्स, स्टाफ, कर्मचारी, नर्स यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन विश्व हिंदू परिषद प्रखंड मंञी अक्षय जगदाळे, मातृशक्तीच्या प्रखंड संयोजिका उज्वलाताई शिंदे, दुर्गा वाहिनीच्या प्रखंड संयोजिका कोमलताई गुंजाळ, मयुरी चासकर, गौरी पांचाळ, जान्हवी टेमगिरे, आदिती मोरडे, अनुष्का थोरात, दिव्या निघोट, साक्षी शेवाळे, अवंतिका वायाळ, मानसी जगदाळे, सानिका दैने, प्रिती शिंदे, साक्षी मोरडे, रुचिका जगदाळे यांनी केले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सत्संग प्रमुख प्रतिक चिखले, बजरंग दल मंचर संयोजक चिन्मय महाजन, अश्विन बढे आदी उपस्थित होते.