समर्थ भारत वृत्तसेवा नारायणगाव ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या शिवजन्मभूमीत (ता.जुन्नर) जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर उभे राहणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. त्यासाठी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोदरे (ता.जुन्नर) गावातील २५ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात २९ तारखेला सर्वात मोठी घोषणा होणार असल्याचे होर्डिंग लावले होते. त्यामुळे सर्वात मोठी कोणती घोषणा होणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागून राहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर निर्माण करताना प्राचीन पद्धतीचे भव्य दिव्य महाद्वार व तटबंदी बांधण्यात येणार आहे. महाराजांच्या जीवनावर आधारित सुसज्ज ग्रंथालय, शिवभक्तांसाठी भोजनालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभा मंडप, संग्रहालय, लेझर वॉटर शोसाठी ॲम्पी थिअटर, छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर व महाराजांची सुवर्णमूर्ती यासह अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. मं...
समर्थ भारत माध्यम समूह