साकोरे प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गेटवेल हॉस्पिटल व ग्रामपंचायत साकोरे यांच्या संयुक्त विद्यमाने, मा.ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पिवळे व केसरी रेशनिंग कार्ड धारकांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अशोक मोढवे यांनी दिली आहे. हे शिबीर गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय कार्यालय साकोरे या ठिकाणी संपन्न झाले.यामध्ये बालरोग, जनरल मेडिसीन, स्त्रीरोग व मूत्ररोग आदी तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरात 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आवाहन उपसरपंच श्रुतिका गाडे यांनी केले होते. या शिबिराला प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ.मोहन साळी, लेप्रोस्कोपी सर्जन डॉ.भूषण साळी, स्त्री रोग तज्ञ डॉ.दीप्ती साळी, बालरोग तज्ञ डॉ.मनोज गोंदाने,जनरल मेडिसीन डॉ.अंजली वर्पे, तज्ञ डॉक्टर्स तसेच बंटी क्षीरसागर, सचिन अभंग,सुनीता राजगोंड, विजय मोढवे,भाऊसाहेब माखरे,प्रदीप पडवळ, आदींनी व्यवस्था पाहिली. या शिबिरातील शिबिरार्थींची गेटवेल हॉस्पिटल मंचर येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच अशोक मोढवे यांनी केले. डॉ.भूषण साळी डॉ. दीप्ती साळी यांनी आभार मानले.