मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना पकडले असून याप्रकरणी पाच जणांविरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहीत अशी कि, दि 6 ऑगस्ट रोजी 3 वाजताच्या सुमारास आरोपी कैलास अनसु भालेराव वय 47 वर्षे, रा. भैरवनाथ, कळंब, बाळु काशिनाथ पारधी वय 42 वर्षे, रा. महाळुंगे पडवळ, सुभाश कुशाबा भोर वय 52 वर्षे रा. लौकी, राणुबाई मळा, रोहीदास दत्तात्रय गोसावी वय 54 वर्षे, रा. कळंब, राजेंद्र सखाराम भेके वय 56 वर्षे, रा. नांदुर भेकेमळा, हे तीन पत्याचा जुगार खेळताना कळंब गावच्या हद्दीत महाळुंगे पडवळ रोडच्या कडेला एच पी गॅस गोडाऊनचे समोरील उसाचे बाजुला असलेल्या झाडीतील एका झाडाखाली वरील पाच आरोपी मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस अविनाश कैलास दळवी यांना मुददेमालासह मिळून आले आहे. या पाच जणांन विरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदारसाबळे हे करत आहे.