मंचर प्रतिनिधी:
आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम मंचर पोलीस स्टेशन आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील NCC कॅडेट व इतर विद्यार्थी यांचे संयुक्त विद्यमाने दि 30 ऑगस्ट 2023 रोजी मंचर पोलीस स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
1)10:00 - ते 10.30 वा - मंचर पोलीस स्टेशन येथे- रक्षाबंधन (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय विध्यार्थी)कार्यक्रम घेण्यात आला.या मध्ये अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
2)10:30 ते 11.10 वा - मंचर पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी पायी रॅली आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत- पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांनी हातात राष्ट्रध्वज/तिरंगी झेंडे घेवुन पायी रॅली काढण्यात आली.या मध्ये भारत माता की जय.. वंदे मातरम,मेरी माटी मेरा देश, जय जवान जय किसान,माटी को वंदन विरों को नमन करत अशा व इतर देशाभिमान पर घोषणा देण्यात आल्या.
आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम पो.नि.बलवंत मांडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संतोष साळुंके,सहा.पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे,पोलीस उपनिरीक्षक-सोमशेखर शेटे यांचे नेतृत्वाखाली मंचर पोलीस स्टेशनचे 20-पोलीस अंमलदार,07-होमगार्ड,तसेच आण्णासाहेब आवटे कॉलेजचे 50-एन.सी.सी.कॅटेड व इतर विद्यार्थी व शिक्षक वर्ग सदर अभियानामध्ये सहभागी झाला होता.