मंचर प्रतिनिधी:
मोबाईलमध्ये शुटींग का काढते असे वडिलांनी मुलीला विचारल्याच्या
कारणावरून मुलीने तिच्याजवळील चाकूने वडिलांच्या हातावर मारत वडिलांना शिवीगाळ
व दमदाटी करून जखमी केलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अस कि, फिर्यादी बबन नामदेव पोखरकर वय 77 वर्ष, रा.पिंपळगाव खडकी ता.आंबेगाव जि. पुणे हे घरी असताना आरोपी दिपाली बबन पोखरकर रा. घाटकोपर मुंबई आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती 23 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 च्या सुमारास फिर्यादी पोखरकर यांच्या घरी जाऊन मोबाईलवरून व्हिडीओ चित्रीकरण कारण करत होती. फिर्यादी यांनी आरोपी दिपाली पोखरकर यांना विचारले असता तु तुझे मोबाइल मध्ये शुटींग का करत आहेस या कारणावरून कारणावरून आरोपी दिपाली पोखरकर तसेच सोबत आलेले दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी बबन पोखरकर यांना शिवीगाळी दमदाटी करून कपडे ओढून हाताने मारहाण केली तसेच आरोपी दिपाली पोखरकर हीने तिच्या जवळील असलेले बॅगेतुन चाकु सारखे दिसणारे वस्तु बाहेर काढून फिर्यादी यांच्या उजवे हातावर मारून आपखुशीने दुखापत केली आहे.
याबाबत बबन नामदेव पोखरकर यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
केला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हवा डावखर हे करत आहे.