पारगाव प्रतिनिधी:
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील एका घरातील महिलेला दमदाटी व शिवीगाळ करत तिच्या गळ्यातील सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. या बाबतची फिर्याद हौसाबाई चंदर वारे ( वय ८० वर्ष ) यांनी पारगाव का. पोलीस स्टेशनला दिली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावात शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगळसूत्र चोरीची घटना घडली हौसाबाई वारे यांचे दार वाजवत घरात प्रवेश करून शिवीगाळ आणी दमदाटी करत त्त्यांच्या गळ्यातील 40,000 रु किमतीचे एक 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यामध्ये काळे मणी व सोन्याचे मनी तसेच सोन्याचे बौद्धांचे चक्र असलेले दागिने चोरून नेले. पारगाव पोलिसांनी दिपक किसन जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किर्वे हे करत आहे.