प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव
लाखणगाव ता. ११ : शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लाखणगाव उपकेंद्रात लसीकरण समुपदेशन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लाखणगाव आणी परिसरातील लहान मुलांचे लसीकरण केल्यानंतर U- WIN नोंदणी करण्यात आली. यावेळी लसीकरण समुपदेशन देखील करण्यात आले.
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा उपाय आहे. एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. डॉ. शेशराव मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. अमोल गायकवाड, तारा माळी, विजया धुमाळ, कुसुम वाळुंज आशा सेविका शीतल दळे, सुनीता पोंदे, यांनी लसीकरण केले. दरम्यान तारा माळी यांनी गरोदर मातांना आहार तसेच गरोदरपणात घ्यावयाची या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी फकिरा मिंडे, मनोज पाटील, अर्जुन पोंदे आणी ग्रामस्थ उपस्थित होते.