समर्थ भारत: लाखणगाव
लाखणगाव ता. 19 :मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्नेहल मोरे नगरसेविका - मुंबई महानगरपालिका, प्रतिक्षा पवार (महिला शाखाप्रमुख), वासंतीताई राणे (महिला गटप्रमुख), श्विनायक सहिंद्रा शंकर कानसकर घाटकोपर (प) विधानसभा समन्वयक-शिव आरोग्य सेना यांच्या कडून लाखणगाव शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख माऊली पाटील, बाळासाहेब रोडे, दत्तात्रय गवते, मा. सरपंच मार्तंड टाव्हरे, महादेव कानसकर, किसन टाव्हरे, संतोष अरगडे, महेश भोजने, सुनील जाधव, राहुल अरगडे लाखणगाव ग्रामस्थ आणी विद्यार्थी उपस्थित होते.
समाजात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायी ठरले,
मंगेश रोडे, नितीन टाव्हरे, सुभाष टाव्हरे, दस्तगीर मुजावर, शिरीष रोडे यांस कडून न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी कब्बड्डी आणि खो खो च्या ग्राउंडसाठी लाल माती प्राप्त झाली त्या ग्राउंडचे उदघाटन स्नेहल मोरे यांनी केले.