Skip to main content

साडेचार लाख रूपयांचे देवांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जुन्नर प्रतिनिधी:




बत्तीस गुन्हे दाखल असलेली त्याचबरोबर मंदिर चोरीचे गुन्हे करणारी आंतरजिल्हा टोळी म्होरक्यासह ताब्यात, सुमारे साडेचार लाख रूपयांचे मंदिरातील देवांचे दागिने केले हस्तगत जुन्नर-खेड विभागातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून एक पथक नेमले होते.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर चोरीतील गुन्हयाच्या  घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बातमीदारामार्फत आरोपींची ओळख पटविली. गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयाचे रेकॉर्डवरील आहेत अशी माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने आरोपींचा शोध घेत असताना दि १४ऑगस्ट२०२३ रोजी टोळीचा म्होरक्या १) भास्कर खेमा पथवे वय ४६ वर्षे रा. नांदुर दुमाला ता संगमनेर जि अहमदनगर यास घोडेगाव परीसरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचे कडील चौकशीत त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्री येथील मंदिरात त्याचा साथीदार २) सोमनाथ शिवाजी भुतांबरे वय २४ वर्षे, रा. समशेरपुर ता अकोले जि अहमदनगर याचे मदतीने केले असून चोरीचे चांदीचे दागिने ३) राजेंद्र रघुनाथ कपिले वय ६२ वर्षे, रा संगमनेर ता संगमनेर जि अहमदनगर यास विक्री केले असल्याचे सांगितले असता त्यास ताब्यात घेवून मंदिर चोरीतील पाच किलो ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मुर्ती सह एकूण सहा किलो सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रू.४,६७,०००/- किंमतीचे हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी सोमनाथ भुतांबरे यास लेण्याद्री फाटा, जुन्नर येथून बातमीचे आधारे ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पुणे ग्रामीण जिल्हयातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून अहमदनगर व नाशिक जिल्हयातील मंदिर घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. आरोपी कडुन उघडकीस आलेले गुन्हे

 

१) जुन्नर पोस्टे गुरनं ३२७/२०२३ भादंवि ४५७,३८० २) जुन्नर पोस्टे गुरनं १६०/२०२३ भादंवि ४५७,३८०

 

३) शिक्रापूर पोस्टे गुरनं ७१३/२०२३ भादंवि ३७९ ४) मंचर पोस्टे गुरनं २८८ / २०२३ भादंवि ३७९

 

मंदिराबाबत नागरीकांच्या धार्मिक भावना व श्रद्धा जोडलेली असून जुन्नर शहरातील ग्रामदैवत असलेले गणेश

 मंदिरात दररोज हजारो नागरीक श्रद्धेने दर्शनास येत असतात. अष्टविनायकापैकी एक असलेले लेण्याद्री मंदिरातील गिरीजात्मज गणपती मंदिरात लाखो भाविक राज्यातून दर्शनासाठी येत असतात. कान्हुर मेसाई येथील जागृत देवस्थान असलेले कुलदेवी मेसाई देवीचे मंदिरात वर्षभर भाविक दर्शनाला येतात. आणि नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. मंचर जाधववाडी परीसरातील तुकाई माता मंदिरात देखील पंचक्रोशीतील नागरीक दर्शनासाठी जात असून नवरात्र उत्सव थाटामाटात साजरा केला जातो.



 


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...