मंचर प्रतिनिधी:
मंचर पोलीस स्टेशनमध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवून मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचर पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर
कार्यक्रमाकरिता मंचर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी सपोनी कांबळे पो.स.ई शेटे व इतर
पोलिस अंमलदार माजी सैनिक, माजी पोलीस अंमलदार, माजी
पोलीस अधिकारी तसेच मंचर हद्दीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.