प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव
लाखणगाव ता. ११ : सन २०२३ हे संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा झाप (काठापूर) येथे कृषी सहाय्यक प्रवीण मिरके यांनी विद्यार्थ्यांना विविध पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती दिली. तसेच या तृण धान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरी, नाचणी, राळा, कोडो इत्यादी तृणधान्ये दाखविण्यात आली. यावेळी शाळेत प्रात्यक्षिकासाठी तृणधान्य नमुने देण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक, कृषी सहाय्यक सुनील लोहकरे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.