Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे यांना मातृशोक

मंचर प्रतिनिधी: पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गोविंदराव गिरे यांच्या मातोश्री बबाबाई गोविंदराव गिरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी मेंगडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील वैकुंठभूमीत सकाळी ९ वाजता पार पडेल.

रक्षाबंधनसाठी भावाकडे गेलेल्या महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास

समर्थ भारत वृत्तसेवा: मंचर ता. ३० : मंचर (ता. आंबेगाव) येथील गांजाळे मळ्यात राहणाऱ्या संध्या गांजाळे या मंगळवारी (दि. २९) रक्षाबंधनच्या निमित्ताने थिगळस्थळ (राजगुरूनगर) येथे गेल्या होत्या. रक्षाबंधन झाल्यानंतर बुधवारी (दि. ३०) पुन्हा सासरी येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत असणाऱ्या तब्बल सव्वा लाखाचे दागिन्यांची चोरी केली आहे. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे. संध्या गांजाळे (वय ४२, मंचर ता. आंबेगाव जि.पुणे) आपल्या सासरी परतत असताना, राजगुरूनगर येथून निघालेल्या बसने मंचर स्थानकावर उतरल्या. त्यानंतर घरी गेल्यावर त्यांना आपल्या पिशवीत ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह दागिन्यांची शोधाशोध करुनही दागिने सापडले नाहीत, म्हणून त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात याविषयी करायदेशिर तक्रार दिली आहे. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅम वजनाचा अंदाजे ५० हजार रुपयांचा लक्ष्मीहार आणि १५ ग्रॅम वजनाचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे नेकलेस आहे. दरम्यान मंचर पोलिसांनी काही संशयित महिला आरोपींना ताब्यात घेतले असून; या महिला बस स्थानक परिसरात ...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मंचर पोलीस स्टेशन मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंचर प्रतिनिधी: आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम मंचर पोलीस स्टेशन आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील  NCC कॅडेट व इतर विद्यार्थी यांचे संयुक्त विद्यमाने दि 30 ऑगस्ट 2023 रोजी मंचर पोलीस स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1)10:00 - ते 10.30 वा - मंचर पोलीस स्टेशन येथे- रक्षाबंधन (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय विध्यार्थी)कार्यक्रम घेण्यात आला.या मध्ये अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील  विद्यार्थीनींनी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. 2)10:30 ते 11.10 वा - मंचर पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी पायी रॅली आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत- पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांनी हातात राष्ट्रध्वज/तिरंगी झेंडे घेवुन पायी रॅली काढण्यात आली.या मध्ये भारत माता की जय.. वंदे मातरम,मेरी माटी मेरा देश, जय जवान जय किसान,माटी को वंदन विरों को नमन करत अशा व इतर देशाभिमान पर घोषणा देण्यात आल्या.  आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश ...

गावरवाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमीपूजन

घोडेगाव प्रतिनिधी: गावरवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधकाम विकासकामाचे भूमीपूजन भाजपचे   उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष व अध्यक्ष पुणे जिल्हा नियोजन उपसमिती श्री शरद भाऊ बुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने आणि मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे यांच्या प्रयत्नातून गावरवाडी ता. आंबेगाव येथे नवीन   अंगणवाडी इमारत बांधणे (रु. 11.25 लक्ष ) या विकासकामाचे भूमीपूजन २८ ऑगस्ट रोजी भाजपचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष आणि   अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा नियोजन उपसमिती शरद बुट्टे यांच्या हस्ते पार पडले. त्याचबरोबर     महिला समता दिनानिमित्त गावरवाडी गावातील महिलांचा सन्मान या वेळी शरद यांच्या हस्ते पार पडला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.   यावेळी मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे ,  जिल्हाध्यक्ष संजय थोरात , आंबेगाव तालुका भाजपा अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे , ह.भ.प.नामदेव महाराज वाळके , शिरूर भाजपा लोकसभा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे , पुणे जिल्हाउपाध्...

मुलीचा वडिलांवर खूनी हल्ला?

मंचर प्रतिनिधी: मोबाईलमध्ये शुटींग का काढते असे वडिलांनी मुलीला विचारल्याच्या कारणावरून मुलीने तिच्याजवळील चाकूने वडिलांच्या हातावर मारत वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करून जखमी केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त अस कि, फिर्यादी बबन नामदेव पोखरकर वय 77 वर्ष, रा.पिंपळगाव खडकी ता.आंबेगाव जि. पुणे हे घरी असताना आरोपी दिपाली बबन पोखरकर रा. घाटकोपर मुंबई   आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती 23 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 च्या सुमारास फिर्यादी पोखरकर यांच्या घरी जाऊन मोबाईलवरून व्हिडीओ चित्रीकरण कारण करत होती. फिर्यादी यांनी आरोपी दिपाली पोखरकर यांना विचारले असता तु तुझे मोबाइल मध्ये शुटींग का करत आहेस या कारणावरून कारणावरून आरोपी दिपाली पोखरकर   तसेच सोबत आलेले दोन अनोळखी व्यक्तींनी   फिर्यादी बबन पोखरकर यांना शिवीगाळी दमदाटी करून कपडे ओढून हाताने मारहाण केली तसेच आरोपी दिपाली पोखरकर हीने तिच्या जवळील   असलेले बॅगेतुन चाकु सारखे दिसणारे वस्तु बाहेर काढून फिर्यादी यांच्या उजवे हातावर मारून आपखुशीने दुखापत केली आहे. याबाबत बबन नामदेव पोखरकर यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला ...

महावितरण शाळकरी मुलांच्या अपघाताची वाट पाहतंय का : स्वप्नील बेंडे

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर, ता. १९ : मंचर येथील अमरनाथ हाईटस लगत महावितरण कंपनीच्या दोन डी.पी. असून; आता अजून एका डी.पीच्या उभारणीचे काम सुरु आहे. या तिन्ही डी.पी.साठी महावितरण कंपनीच्या मंचर सुपर मार्केट मागील डी.पी. पासून ११ केव्हीच्या भूमिगत केबलने वीज पुरवठा प्रस्तावित आहे. या कामातील केबल अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. सदर केबल्स अनेक ठिकाणी उघड्यावर असल्याने तसेच निर्धारित खोलीपर्यंत योग्य काळजी घेऊन न गाड्ल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असून; महावितरण कंपनी शाळकरी मुलांच्या अपघाताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि युवा नेते स्वप्नील बेंडे यांनी केला असून कंपनीने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी देखील केली आहे. सदर वीजपुरवठा करतेवेळी खोलवर गाडून पाईप मध्ये केबल टाकून काम करण्याऐवजी जमिनीपासून सुमारे अर्धा फुट खोलवर कोणत्याही पाईप मधून ही केबल टाकलेली नाही. सदर केबल खोलवर न गाड्ल्यामुळे मंचर नगरपंचायच्या वतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दरम्यान दोन वेळा या  केबलला जे.सी.बी.च्या बक...

साकोरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

साकोरे प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गेटवेल हॉस्पिटल व ग्रामपंचायत साकोरे यांच्या संयुक्त विद्यमाने, मा.ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पिवळे व केसरी  रेशनिंग कार्ड धारकांनी मोफत उपचाराचा लाभ  घेतला, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अशोक मोढवे यांनी दिली आहे. हे शिबीर गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय कार्यालय साकोरे या ठिकाणी संपन्न झाले.यामध्ये बालरोग, जनरल मेडिसीन, स्त्रीरोग व मूत्ररोग आदी तपासण्या करण्यात आल्या.  शिबिरात 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आवाहन उपसरपंच श्रुतिका गाडे यांनी केले होते. या शिबिराला प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ.मोहन साळी, लेप्रोस्कोपी सर्जन डॉ.भूषण साळी, स्त्री रोग तज्ञ डॉ.दीप्ती साळी, बालरोग तज्ञ डॉ.मनोज गोंदाने,जनरल मेडिसीन डॉ.अंजली वर्पे, तज्ञ डॉक्टर्स तसेच बंटी क्षीरसागर, सचिन अभंग,सुनीता राजगोंड, विजय मोढवे,भाऊसाहेब माखरे,प्रदीप पडवळ, आदींनी व्यवस्था पाहिली. या शिबिरातील शिबिरार्थींची गेटवे...

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

समर्थ भारत: लाखणगाव लाखणगाव ता. 19 :मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्नेहल मोरे  नगरसेविका - मुंबई महानगरपालिका, प्रतिक्षा पवार (महिला शाखाप्रमुख), वासंतीताई राणे (महिला गटप्रमुख), श्विनायक सहिंद्रा शंकर कानसकर घाटकोपर (प) विधानसभा समन्वयक-शिव आरोग्य सेना यांच्या कडून लाखणगाव शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख माऊली पाटील, बाळासाहेब रोडे, दत्तात्रय गवते, मा. सरपंच मार्तंड टाव्हरे, महादेव कानसकर, किसन टाव्हरे, संतोष अरगडे, महेश भोजने, सुनील जाधव, राहुल अरगडे लाखणगाव ग्रामस्थ आणी विद्यार्थी उपस्थित होते. समाजात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायी ठरले, मंगेश रोडे, नितीन टाव्हरे, सुभाष टाव्हरे, दस्तगीर मुजावर, शिरीष रोडे यांस कडून न्...

मंचरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग, कपडे आणि फर्निचर जळून खाक

मंचर प्रतिनिधी: मंचर ता. आंबेगाव येथे हरीओम कॉम्प्लेक्स मधील गाळ्यामध्ये गौरव चंद्रकांत रोडे यांचे स्वागत जेन्ट्स शॉपी नावाचे कपड्याचे दुकान आहे. रोडे हे रात्री दुकान बंद करुन घरी गेले होते. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाचे कार्यकर्ते जवळच असलेल्या मराठी शाळेच्या मैदानात दहीहंडीचा सराव करत होते. त्यावेळी अचानक मोठा आवाज होऊन आरडा ओरडा झाला. युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता दुकानातून धूर येताना दिसला.  त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान दाखवत राखत शटर उचकटून पाहिल्यास आत मध्ये आग लागली होती. त्यांनी तात्काळ दुकानासमोरील पाण्याच्या टाकीतील पाणी बादलीने काढत पेटलेल्या आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. पाऊण तास आग विझवत होते. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व कपडे व फर्निचर जळून खाक झाले होते. ही आग दुकानात असलेल्या वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि गावातील तरुणवर्ग घटनास्थळी दाखल झाले.

शेतकरी शेतात पाणी भरायला गेला असता बिबट्या आढळला मृत अवस्थेत

प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव  आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथील गोविंद बाबुराव खांडगे यांच्या शेतात 16 ऑगस्ट 2023 रोजी(बुधवार) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. गोविंद खांडगे यांचा मुलगा सागर खांडगे उसाला पाणी देण्यासाठी गेला असता त्याला बिबटया मृत अवस्थेत आढळून आला.  देवगाव शिवारात घोडनदी पाण्याचे क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे पीक आहे.  सावली व थंड हवेमुळे वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असते.  त्यामुळे शेतकऱ्यात नेहमी भीतीचे वातावरण असते आपला जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना आपल्या पिकांना रात्री व दिवसा पाणी द्यावे लागते. गणेश खांडगे यांना दोन वेळा बिबट्या दिसण्याची चर्चा असताना आज एक बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने पाहणाऱ्यांची गर्दी ऊसळली होती.  बिबट्याची बातमी कळताच गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. चंद्रकांत खांडगे यांनी त्वरित वन विभागाला कळवल्याने वन विभाग कर्मचारी साईमला गिते, आणि रेस्कुटीम सभासद त्या ठिकाणी हजर झाले मात्र बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. शेतकरी बांधवांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे. वनवि...

पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पारगाव प्रतिनिधी: पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त सकाळी 07:00 वाजता ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना दिली आहे. सदर ठिकाणी सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते.   सदर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. तसेच माजी पोलीस अधिकारी , कर्मचारी , माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.      

साडेचार लाख रूपयांचे देवांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जुन्नर प्रतिनिधी: बत्तीस गुन्हे दाखल असलेली त्याचबरोबर   मंदिर चोरीचे गुन्हे करणारी आंतरजिल्हा टोळी म्होरक्यासह ताब्यात , सुमारे साडेचार लाख रूपयांचे मंदिरातील देवांचे दागिने केले हस्तगत जुन्नर-खेड विभागातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून एक पथक नेमले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर चोरीतील गुन्हयाच्या   घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बातमीदारामार्फत आरोपींची ओळख पटविली. गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयाचे रेकॉर्डवरील आहेत अशी माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने आरोपींचा शोध घेत असताना दि १४ऑगस्ट२०२३ रोजी टोळीचा म्होरक्या १) भास्कर खेमा पथवे वय ४६ वर्षे रा. नांदुर दुमाला ता संगमनेर जि अहमदनगर यास घोडेगाव परीसरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचे कडील चौकशीत त्याने जुन्नर , मंचर , कान्हूर मेसाई , लेण्याद्री येथील मंदिरात त्याचा साथीदार २) सोमनाथ शिवाजी भुतांबरे वय २४ वर्षे ...

मंचर पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस स्टेशनमध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात  साजरा करण्यात आला   मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवून मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता मंचर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी सपोनी कांबळे पो.स.ई शेटे व इतर पोलिस अंमलदार माजी सैनिक , माजी पोलीस अंमलदार , माजी पोलीस अधिकारी तसेच मंचर हद्दीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.  

ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी-शिवसेना पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे

मंचर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील ज्या गावात एस.टी.जाते ती गावे विकसित झालेली आहेत.त्या मूळे एस.टी.सेवा अखंडपणे सुरू रहावी यासाठी राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी केले आहे. सद्यस्थितीत केन्द्र सरकार व राज्य सरकार सर्व सार्वजनिक उद्योग, सेवा व संस्थांचे खाजगीकरण करण्याचा धडाका लावला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून आधीच चार कंपन्या निर्माण केल्या आहेत.आता या विज कंपन्या देखील एका अडाणी उद्योगपतीला विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.हा डाव सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे.उर्जा विभाग उद्योगपती ने खरेदी केल्यास त्याच्या फायद्या साठी तो त्याला जास्त लाभ होण्यासाठी वाटेल त्या दराने वीज पुरवठा करील.अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती केले जाईल, त्यांना पेन्शन मिळणार नाही.यामुळे या खाजगीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध व्हायला हवा.  राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळतील त्या प्रवाशांना घेऊन दिलेल्या वेळेत पोहचतात.महा मंडळ फायदा तोट्याचा विचार न करता केवळ जनतेच्या...

लाखणगाव येथे लसीकरण समुपदेशन

प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव  लाखणगाव ता. ११ : शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लाखणगाव  उपकेंद्रात लसीकरण समुपदेशन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लाखणगाव आणी परिसरातील लहान मुलांचे लसीकरण केल्यानंतर U- WIN नोंदणी करण्यात आली. यावेळी लसीकरण समुपदेशन देखील करण्यात आले.  लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा उपाय आहे. एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. डॉ. शेशराव मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. अमोल गायकवाड, तारा माळी, विजया धुमाळ, कुसुम वाळुंज आशा सेविका शीतल दळे, सुनीता पोंदे, यांनी लसीकरण केले. दरम्यान तारा माळी यांनी गरोदर मातांना आहार तसेच गरोदरपणात घ्यावयाची या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी फकिरा मिंडे, मनोज पाटील, अर्जुन पोंदे आणी ग्रामस्थ उपस्थित होते.

पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करा

प्रतिनिधी: विजय कानसकर, लाखणगाव  लाखणगाव ता. ११ : सन २०२३ हे संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा झाप (काठापूर) येथे कृषी सहाय्यक प्रवीण मिरके यांनी विद्यार्थ्यांना विविध पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती दिली. तसेच या तृण धान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरी, नाचणी, राळा, कोडो इत्यादी तृणधान्ये दाखविण्यात आली. यावेळी शाळेत प्रात्यक्षिकासाठी तृणधान्य नमुने देण्यात आले.  यावेळी सर्व शिक्षक, कृषी सहाय्यक सुनील लोहकरे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

फासेपारधी समाजाचा धडक मोर्चा थेट तहसील कार्यलयावर

घोडेगाव प्रतिनिधी:  ९ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष होऊनही मुलभूत सुविधा, राज्य घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहुन आज शासनदरबारी दाद मागण्यासाठी घोडेगाव येथे घोडेगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा चे आयोजन करून निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपजिल्हासंघटक कलावती पोटकुले, तालुका संघटक प्रा.सुरेखा निघोट फासेपारधी समाजाचे नेते नामदेव भोसले ,महिपत भोसले, रेश्मा भोसले, कलावती भोसले,शारदा भोसले,चलाख भोसले, बलवार पवार, सचिन भोसले,चान्स भोसले फासेपारधी समाजा शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नामदेव भोसले यांनी फासेपारधी समाजाला, जातीचे दाखले मिळत नसल्याने उच्च शिक्षणापासून मुले वंचित रहात असुन शिष्यवृत्ती नसल्याने शाळा महाविद्यालयांचे महागडे शिक्षण परवडत नसल्याने शिक्षण सोडून द्यावे लागत असल्याने प्रगती खुंटली आहे, स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली तरी आजही हा समाज भौतिक सुविधांपासून वंचित असुन,झोपडी-पालात रहात आहे, वीजे...

वृद्ध महिलेला मारहाण करत नेले मंगळसुत्र चोरून

पारगाव प्रतिनिधी: पोंदेवाडी ( ता. आंबेगाव )  येथील एका घरातील महिलेला दमदाटी व शिवीगाळ करत तिच्या गळ्यातील सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. या बाबतची फिर्याद हौसाबाई चंदर वारे  ( वय ८० वर्ष ) यांनी पारगाव का. पोलीस स्टेशनला दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावात शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगळसूत्र चोरीची घटना घडली हौसाबाई वारे यांचे दार वाजवत घरात प्रवेश करून शिवीगाळ आणी दमदाटी करत त्त्यांच्या गळ्यातील 40,000 रु किमतीचे एक 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यामध्ये काळे मणी व सोन्याचे मनी तसेच सोन्याचे बौद्धांचे चक्र असलेले दागिने चोरून नेले. पारगाव पोलिसांनी दिपक किसन जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किर्वे हे करत आहे.

पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करा- लहु थाटे

 पारगाव प्रतिनिधी: पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलीस व ग्रामीण पोलीस पुणे अॅक्शन मोडवर आले असून भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिस स्टेशन करत आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. भाडेकरूची माहिती न ठेवल्यामुळे काही समाजकंटक त्याचा फायदा उठवत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील घर , फ्लॅट , जागा , गोडाऊन , दुकानदार तसेच छोट्या मोठ्या कंपनी मालक , कॉन्ट्रॅक्टर व इतर मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चारित्र्य प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूला गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देऊ न...

जुगार खेळताना ५ जणांना पकडले रंगेहात

मंचर प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तीन पत्याचा जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना  पकडले असून याप्रकरणी पाच जणांविरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहीत अशी कि, दि 6 ऑगस्ट रोजी 3 वाजताच्या सुमारास आरोपी कैलास अनसु भालेराव वय 47 वर्षे , रा. भैरवनाथ , कळंब, बाळु काशिनाथ पारधी वय 42 वर्षे , रा. महाळुंगे पडवळ , सुभाश कुशाबा भोर वय 52 वर्षे रा. लौकी , राणुबाई मळा , रोहीदास दत्तात्रय गोसावी वय 54 वर्षे , रा. कळंब, राजेंद्र सखाराम भेके वय 56 वर्षे , रा. नांदुर भेकेमळा , हे तीन पत्याचा जुगार खेळताना कळंब गावच्या हद्दीत महाळुंगे पडवळ रोडच्या कडेला एच पी गॅस गोडाऊनचे समोरील उसाचे बाजुला असलेल्या झाडीतील एका झाडाखाली वरील पाच आरोपी मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस अविनाश कैलास दळवी यांना मुददेमालासह मिळून आले आहे. या पाच जणांन विरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस नि...