समर्थ भारत वृत्तसेवा
महाळुंगे, ता. १८ : घोडेगाव वनपरिक्षेत्रातील तळेकरवाडी येथे विना परवानगी वृक्ष तोड़ केल्याप्रकरणी महाराष्ट्र वृक्ष तोड़ अधिनियम १९६४ च्या कलम ३ब नुसार कारवाई करनेत आली असून जवळपास ४ टन आंबा या प्रजातिचे जळावू लाकुड़ असलेला अवैध माल जप्त करण्यात आला आहे
तळेकरवाडी येथे श्री विश्वास तलेकर यांचेद्वारे त्यांच्या मालकी गट नंबर ३४१ मधे विनापरवाना वृक्ष तोड़ सुरु असलेबाबत समजले नंतर प्रत्यक्ष घटना स्थळी जावून सदरची कारवाई घोडेगाव वनविभागाने केली आहे. सदरिल माल हा विनापरवानगी तोडला असलेबाबत संबधित शेतमालकने कबुल केले असून सदरिल माल हा बाहेर गावी विकनार असल्याबाबत सांगण्यात मालकादवारे आले. यावेळी कटाईचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जुन्नरचे उपवनसरक्षक अमोल सातपुते सातपुते व सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, वनपाल इथापे, वनरक्षक कंधरकार यांनी केली. याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरु असून नमूद कायद्यानुसार संबधितावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.