प्रतिनिधी: धनंजय पोखरकर
आंबेगाव तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये वसूलीच्या नोटीसेस पाठविणे,माहिती प्रभारी मोजणी करणे,अपिल प्रकरणांची आदेश पारित करणे तालुक्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमी /दफनभूमी नाही,अशा गावांचे स्मशानभूमी / दफनभूमीचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन शक्य झाल्यास अशा प्रस्तावावर त्याच दिवशी निर्णय घेणे,मंडल अधिकारी स्तरावर महसूल अदालतीचे आयोजन करणे, पानंद रस्ते खुले करणे,लहान मुले,अंगणवाडी व अनाथ मुले यांच्यासाठी आधार सिडिंग कॅम्पचे आयोजन करून आधार नोंदणी करणे,अनाथ मुले / पात्र लाभार्थी यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करणे,गाव पातळीवर प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन तक्रार निवारण करणे, ध्वजदिन निधीचे संकलन करणे, तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभाचे आयोजन करून मागील महसूल वर्षात तसेच महसूल सप्ताहमध्ये चांगले काम / डॉक्युमेंटेशन / शासकीय वसुली करणारे अधिकारी /कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करणेबाबतची माहिती तहसिलदार संजय नागटिळक व नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी शिबीर महसूल माध्यमांना दिली.
असा साजरा होईल 'महसूल सप्ताह
१ ऑगस्ट रोजी "महसूल दिन साजरा करून व महसूल सप्ताहचा शुभारंभ" होईल.
२ ऑगस्ट रोजी ''युवा संवाद '' होईल.
३ ऑगस्ट रोजी "एक हात मदतीचा" ही संकल्पना राबविली जाईल.
४ ऑगस्ट रोजी ''जनसंवाद'' होईल.
५ ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी"हा उपक्रम राबविण्यात येईल.
६ ऑगस्ट रोजी ''महसुल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा संवाद" कार्यक्रम होईल.
७ ऑगस्ट रोजी ''महसूल सप्ताह सांगता समारंभ" होईल.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,याबाबत आंबेगाव तालुक्यातील अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजबद्दल नागरिकांचा विश्वास वृंधीगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकांभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी आंबेगाव तालुक्यात महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.