जुन्नर प्रतिनिधी:
वडिलांनी दारू पिण्यासाठी 500 रुपये दिले नाही म्हणून मुलाने रागात शिवीगाळ दमदाटी करत वडिलांवर विळ्याने वार केल्याची घटना समोर आली आहे.
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे ही घटना घडली आहे. संजय चंद्रकांत ढोबळे रा. माणिकडोह, ता. जुन्नर याच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील चंद्रकांत ढोबळे वय 78 वर्ष यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ढोबळे हे घरात एकटे असताना संजय याने त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत 500 रुपयांची मागणी केली. दारु पिण्यास पैसे देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने संजयने विळाने त्यांच्यावर वार केले आणि तेथून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे.