Skip to main content

अत्याधुनिक यंत्रणेमुळे एका मंदिरातील चोरी फसली तर यंत्रणा नसल्याने दुसरीकडील मंदिरात झाली चोरी

बेल्हे प्रतिनिधी: सुधाकर सैद 



बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री १२.२० मिनिटांनी तीन चोरट्यांनी श्रीक्षेत्र नळवणे गडावरील येथील महाराष्ट्राचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर आवारात प्रवेश केला व मंदिराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु देवस्थानने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविली असल्याने त्यांनी दरवाजाला हात लावताच मंदिराचा सायरन वाजला व त्यामुळे चोरटे ताबडतोब पळून गेले व त्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, तिघेही चोर मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून ते गडावरून पळून खाली आल्यानंतर गुंडवस्ती वरील श्रीरामेश्वर मंदिराचे कुलूप तोडून  मंदिरातील दान पेटी फोडली व त्यामध्ये असलेली रक्कम घेऊन पळून गेले. 



सदर घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत  नलावडे साहेब व त्यांच्या सहका-यांनी  दोन्ही घटनास्थळी येऊन पाहाणी केली व सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत,तसेच देवस्थानने या पुढे प्रत्येक आठवड्याला दानपेटी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

 परिसरातील सर्व नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केल आहे.



पॉप्युलर

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..

मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्याघटना केल्याची खळबळजनक बुधवार दिनांक .२५ मे २०२२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले(वय.२५ वर्षे) रा.मुक्ताई नगर नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी यांची पत्नी दिनांक.२३ मे २०२२ रोजी माहेरी चांडोली,ता.खेड येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.दिनांक.२५ मे रोजी फिर्यादीची पत्नी सुप्रिया हिने तिचा पती यास फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणाऱ्या मोकळ्या १३ नंबर रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले असून आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबियांनी रूमचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना खाली घेऊन ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उप...

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा खून; पाच जणांना अटक.

पुणे प्रतिनिधी: हॉटेल पार्किंग मधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.   नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३ वर्षे ) रा. आंबेगाव बु. असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.   युवराज जंबु कांबळे , ओंकार अशोक रिठे , वैभव पोपट अदाटे , मनोज दत्तात्रय सूर्यवंशी , विष्णु कचरु कदम रा. नर्‍हे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.   याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष रमेश कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना   साई विश्व सोसायटी , न्यू प्यारा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे यांना बेदम मारहाण केली.   त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट , मोबाईल , हेडफोन इत्यादी वस्तू चोरुन नेल्या. मंगळवारी सकाळी ...