मंचर प्रतिनिधी:
काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ अवसरी खुर्द यांचा सतरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सखाराम तात्या शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्याध्यक्ष बी एल शिंदे यांनी केले समारंभामध्ये 25 ज्येष्ठ नागरिकांना काठ्या वाटण्यात आल्या तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याबरोबरच समाजासाठी ही काम केले पाहिजे आपल्या घरातील लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आता ज्येष्ठांवर आहे ज्येष्ठांनी स्वतःच्या आनंदासाठी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सामील व्हावे व लवकरात लवकर अवसरी खुर्द मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळाभवन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रमुख पाहुणे दशरथ भालेराव यांनी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची कार्यपद्धती सांगितली ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलतींविषयी चर्चा केली.
अवसरीचा संघ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमात संघाचे कोषाध्यक्ष सखाराम भालेराव सहकोशाध्यक्ष सोपान हुले नांदूरच्या संघाचे अध्यक्ष रंगनाथ वायाळ मंचरचे अध्यक्ष महामुनी सर यांनी आपले विचार मांडले आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शरद शिंदे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा भवन देण्यात येईल व ज्येष्ठांना लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती महाजन यांनी केले तर आभार संघाचे सचिव यांनी मांडले आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले उपस्थित होते. अशी माहिती तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे प्रसिद्धी प्रमुख व पेठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलासराव रासकर यांनी दिली.