मंचर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जुलै 2023 रोजी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे महसूल, कृषी व पशुसंवर्धन तसेच पंचायत समिती स्तरावरील राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रोत्साहनपर उपक्रम, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदानपर योजना, यांबाबत पंचायत समिती, घोडेगाव येथे विविध अडचणीस्तव चर्चा केली.
यावेळी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तहसीलदार नागटिळक, मा. सभापती प्रकाशराव घोलप, मा. सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आंबेगाव विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप चपटे, मा. जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर व विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.