समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर, ता. २० : भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर अधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष पुनःनिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकरी हे 21 जुलै 2023 रोजी पासून घरोघरी जाणार आहेत. सदरची मोहिम ही 21 ऑगस्ट पर्यंत राबविली जाणार आहे. या उपविभागात 195 जुन्नर व 196 आंबेगाव शिरूर मतदार संघ असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकरी (बी.एल.ओ.) यांची नेमूण केलेली आहे. या मोहिमेमध्ये 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचे मृत्यू दाखले घेवून मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरीत कुटूंबाकडून फॉर्म भरुन घेणे, 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे, आणि मतदार यादीशी अधार कार्ड लिंक करण्यासाठी अधार कार्डची माहीत घेणे, अंध अपंग मतदार यांच्या यादया तयार करणे इत्यादी कामे या मोहिमेत करणेत येणार आहेत.
विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे औचित्य साधून मतदान संघ स्तरावर सदर कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने मतदार संघातील मोठया सोसायटी असलेल्या ठिकाणी दि. 22 व 23 जुलै रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सदर ठिकाणी 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचे मृत्यू दाखले घेवून मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरीत कुटूंबाकडून फॉर्म भरुन घेणे, 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे, आणि मतदार यादीशी अधार कार्ड लिंक करण्यासाठी अधार कार्डची माहीत घेणे, अंध अपंग मतदार यांच्या यादया तयार करणे इत्यादी कामे करणेत येणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी सदर मोहमेस सहकार्य करुन मतदार यादीतील आपल्या नावाची तपासणी करणे, दुबार नावे वगळणे व मतदार यादीचे शुध्दीकरणासाठी सहकार्य करावे असे अहवान करण्यात येत आहे.