समर्थ भारत वृत्तसेवा
महळुंगे, ता. १८ : ठाकरवडी, चास (ता. आंबेगाव) चे आदर्श सरपंच बबन मारुती बारवे यांच्या मातोश्री ठकुबाई मारुती बारवे (वय ७५ वर्ष) यांचे मंगळवारी (दि. १८/०७/२०२३) पहाटे ४ वाजता निधन झाले असून, त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १८) दुपारी ३ वा. चास येथील घोड नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत पार पडेल.
आदर्श सरपंच बबन मारुती बारवे यांच्या मातोश्रींच्या जाण्याने बारवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून; तालुक्यातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.