Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

पाचशे रुपयासाठी मुलानेच केला वडिलांवर केला विळ्याने वार

जुन्नर प्रतिनिधी: वडिलांनी दारू पिण्यासाठी 500 रुपये दिले नाही म्हणून   मुलाने रागात शिवीगाळ दमदाटी करत वडिलांवर विळ्याने वार केल्याची  घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे ही घटना घडली आहे. संजय चंद्रकांत ढोबळे रा. माणिकडोह, ता. जुन्नर याच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील चंद्रकांत ढोबळे वय 78 वर्ष यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ढोबळे हे घरात एकटे असताना संजय याने त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत 500 रुपयांची मागणी केली. दारु पिण्यास पैसे देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने संजयने विळाने त्यांच्यावर वार केले आणि तेथून पळून गेला. या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे.

आंबेगाव तालुक्यात महसूल सप्ताह होणार साजरा

प्रतिनिधी: धनंजय पोखरकर आंबेगाव तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये वसूलीच्या नोटीसेस पाठविणे,माहिती प्रभारी मोजणी करणे,अपिल प्रकरणांची आदेश पारित करणे तालुक्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमी /दफनभूमी नाही,अशा गावांचे स्मशानभूमी / दफनभूमीचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन शक्य झाल्यास अशा प्रस्तावावर त्याच दिवशी निर्णय घेणे,मंडल अधिकारी स्तरावर महसूल अदालतीचे आयोजन करणे, पानंद रस्ते खुले करणे,लहान मुले,अंगणवाडी व अनाथ मुले यांच्यासाठी आधार सिडिंग कॅम्पचे आयोजन करून आधार नोंदणी करणे,अनाथ मुले / पात्र लाभार्थी यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करणे,गाव पातळीवर प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन तक्रार निवारण करणे, ध्वजदिन निधीचे संकलन करणे, तसेच महसूल सप्ताह  सांगता समारंभाचे आयोजन करून मागील महसूल वर्षात तसेच महसूल सप्ताहमध्ये चांगले काम / डॉक्युमेंटेशन / शासकीय वसुली करणारे अधिकारी /कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करणेबाबतची माहिती तहसिलदार संजय नागटिळक व नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी शिबीर महसूल माध्यमांना दिली. असा साजरा होईल 'महसूल सप्ताह १ ऑगस्ट ...

विज ग्राहकांच्या मागण्यांसाठी आयोजित मोर्चास अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद!

मंचर प्रतिनिधी: वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी मंचर विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर आयोजित केला आहे. हा मोर्चा सर्व पक्षीय असल्याने त्यात सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकते सहभागी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संघटक ॲड.अविनाश रहाणे यांनी वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी मंचर विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चाची दखल घेत. विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बाऺगर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  सोमवार दि.३१ जुलै रोजी ॲड.अविनाश रहाणे यांच्या मंचर येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन वीज ग्राहकांच्या समस्या समजावून घेतल्या यावेळी विज वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सुधीर पन्नीकर,उप कार्यकारी अभियंता अनिल डोंगरे यांनी चर्चा केली. या बैठकीत जेष्ठ शिवसैनिक शिवकल्याण पतसंस्थेचे व्हाईसचेअरमन रऺगनाथनाना थोरात, विभागप्रमुख विजय जाधव, खादी ग्रामोद्योग सऺघाचे माजी चेअरमन राजु सोमवऺशी, वहातुक सेनेचे तालुकाप्रमुख संजय चिऺचपुरे, महिला आ...

सर्पदंश झाल्यास रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नये - डॉ. सदानंद राऊत

घोडेगाव प्रतिनिधी: सर्पदंश झाल्यास रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नये, अघोरी उपायांमुळे सर्पदंशाचा रुग्ण दगावू शकतो. त्यास धीर देऊन त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे,’ असे आवाहन सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले. घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळेत न्यूक्लीअस बजेट योजना २०२३ अंतर्गत उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राऊत बोलत होते. डॉ. राऊत यांनी सांगितले की, सर्पदंश हा शेतीसंबंधी होणारा गंभीर अपघात असून, तातडीने उपचार केल्यास रुग्णाचा प्राण वाचू शकतो, सर्पदंश टाळण्यासाठी शेतात काम करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यास उदा. बूट वापरणे, पूर्ण अंगावर कपडे घालणे, रात्रीच्या वेळी अंधारात हातात काठी व बॅटरीच्या उजेडात चालणे, फळबागेत काम करताना डोक्यात टोपी घालणे, रात्रीच्या वेळी जमिनीवर न झोपता कॉटचा वापर करणे, आदी साधे प्रयोग केले, तरी सर्पदंशाचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्या परिसरात आढळणारे नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चारही साप अतिविषारी असून, यांच्या दंशानंतर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे असते. नाग आणि मण्य...

नारोडी : महिला पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी पत्रकार महासंघ आक्रमक

मंचर प्रतिनिधी: मंचर, ता. २६ : समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना आमच्या गावच्या खड्ड्यांवर आणि तमाशावर बातमी का बनवली, असे म्हणत रस्त्यात अडवून घातपात करण्याची आणि कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ आक्रमक झाला असून. पत्रकार महासंघाच्या वतीने मंचर आणि पारगाव पोलिसांना निवेदन देत निषेध करण्यात आला आहे. नारोडी (ता. आंबेगाव) गावातून नारोडी फाट्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून झालेल्या दुर्दशेवर समर्थ भारत माध्यम समूहातील SBP या वृत्तवाहिनीवर दि. २४ जुलै २०२३ रोजी एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्तामध्ये गावातील पुढाऱ्यांना तमाशा भरविण्यासाठी आर्थिक तरतूद करता येते, मात्र रस्त्यांच्या दुर्दशेवर आणि इतर समस्यांवर लक्ष देण्यासाठी आर्थिक चणचण भासते, अशा आशयाचे भाष्य करण्यात आले होते. हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गावातील काही पुढाऱ्यांनी समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून धमकाविले. आम्ही आमच्या गावात काहीही करू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? आम्ही तमा...

काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ अवसरी खुर्द यांचा सतरावा वर्धापन दिन साजरा

मंचर प्रतिनिधी: काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ अवसरी खुर्द यांचा सतरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सखाराम तात्या शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्याध्यक्ष बी एल शिंदे यांनी केले समारंभामध्ये 25 ज्येष्ठ नागरिकांना काठ्या वाटण्यात आल्या तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याबरोबरच समाजासाठी ही काम केले पाहिजे आपल्या घरातील लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आता ज्येष्ठांवर आहे ज्येष्ठांनी स्वतःच्या आनंदासाठी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सामील व्हावे व लवकरात लवकर अवसरी खुर्द मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळाभवन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रमुख पाहुणे दशरथ भालेराव यांनी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची कार्यपद्धती सांगितली ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलतींविषयी चर्चा केली.  अवसरीचा संघ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त के...

धरणात बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह मिळाला

  जुन्नर प्रतिनिधी:   मासेमारी करण्यासाठी माणिकडोह धरणाच्या (ता. जुन्नर) जलाशयात गेलेल्या आदिवासी ठाकर समाजातील कैलास शंकर जाधव (वय ४५ , रा. खामगाव-शिवेचीवाडी , ता. जुन्नर) यांचा मृतदेह तीन दिवसानंतर शुक्रवारी (ता. २१) सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला. कैलास जाधव हे मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांचे कपडे , चप्पल काठावर आढळून आले होते , तर मासेमारीसाठीची रबरी ट्यूब पाण्यावर तरंगत होती. त्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची शंका व्यक्त होत होती. खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी पोलिस , तहसील जलसंपदा , तसेच आपत्कालीन विभागास याबाबत माहिती दिली होती. स्थानिक रेस्क्यू पथक व ग्रामस्थांनी दोन दिवस पाण्यात गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.  घटनास्थळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी भेट दिली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी पाणबुडीच्या साहाय्याने शोघ घेण्याची मागणी केली होती. मात्र , तीन दिवसानंतर शुक्रवारी जाधव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दरम्यान , तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात बुडाल्याच्या घटना वारंवार घडतात यासाठी अत्याधुनिक ...

सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर चर्चा

मंचर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जुलै 2023 रोजी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे महसूल, कृषी व पशुसंवर्धन तसेच पंचायत समिती स्तरावरील राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रोत्साहनपर उपक्रम, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदानपर योजना, यांबाबत पंचायत समिती, घोडेगाव येथे विविध अडचणीस्तव चर्चा केली. यावेळी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तहसीलदार नागटिळक, मा. सभापती प्रकाशराव घोलप, मा. सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आंबेगाव विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप चपटे, मा. जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर व विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अत्याधुनिक यंत्रणेमुळे एका मंदिरातील चोरी फसली तर यंत्रणा नसल्याने दुसरीकडील मंदिरात झाली चोरी

बेल्हे प्रतिनिधी: सुधाकर सैद  बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री १२.२० मिनिटांनी तीन चोरट्यांनी श्रीक्षेत्र नळवणे गडावरील येथील महाराष्ट्राचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर आवारात प्रवेश केला व मंदिराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु देवस्थानने अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविली असल्याने त्यांनी दरवाजाला हात लावताच मंदिराचा सायरन वाजला व त्यामुळे चोरटे ताबडतोब पळून गेले व त्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, तिघेही चोर मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून ते गडावरून पळून खाली आल्यानंतर गुंडवस्ती वरील श्रीरामेश्वर मंदिराचे कुलूप तोडून  मंदिरातील दान पेटी फोडली व त्यामध्ये असलेली रक्कम घेऊन पळून गेले.  सदर घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत  नलावडे साहेब व त्यांच्या सहका-यांनी  दोन्ही घटनास्थळी येऊन पाहाणी केली व सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत,तसेच देवस्थानने या पुढे प्रत्येक आठवड्याला दानपेटी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.  परिसरातील सर्व नागरिकांनी रात्रीच्या वेळ...

शिरूर आंबेगाव मध्ये निर्वाचन आयोगाची विशेष मोहीम सुरू

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर, ता. २० : भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर अधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष पुनःनिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकरी हे 21 जुलै 2023 रोजी पासून घरोघरी जाणार आहेत. सदरची मोहिम ही 21 ऑगस्ट पर्यंत राबविली जाणार आहे. या उपविभागात 195 जुन्नर व 196 आंबेगाव शिरूर मतदार संघ असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकरी (बी.एल.ओ.) यांची नेमूण केलेली आहे. या मोहिमेमध्ये 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचे मृत्यू दाखले घेवून मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरीत कुटूंबाकडून फॉर्म भरुन घेणे, 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे, आणि मतदार यादीशी अधार कार्ड लिंक करण्यासाठी अधार कार्डची माहीत घेणे, अंध अपंग मतदार यांच्या यादया तयार करणे इत्यादी कामे या मोहिमेत करणेत येणार आहेत. विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे औचित्य साधून मतदान संघ स्तरावर सदर कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने मतदार संघातील मोठ...

घोडेगाव वनपरिक्षेत्रामधे अवैध वृक्षतोड प्रकरणी वनविभागाची कारवाई

समर्थ भारत वृत्तसेवा महाळुंगे, ता. १८ : घोडेगाव वनपरिक्षेत्रातील तळेकरवाडी येथे विना परवानगी वृक्ष तोड़ केल्याप्रकरणी महाराष्ट्र वृक्ष तोड़ अधिनियम १९६४ च्या कलम ३ब नुसार कारवाई करनेत आली असून जवळपास ४ टन आंबा या प्रजातिचे जळावू लाकुड़ असलेला अवैध माल जप्त करण्यात आला आहे  तळेकरवाडी येथे श्री विश्वास तलेकर यांचेद्वारे त्यांच्या मालकी  गट नंबर ३४१  मधे विनापरवाना वृक्ष तोड़ सुरु असलेबाबत समजले नंतर प्रत्यक्ष घटना स्थळी जावून सदरची कारवाई घोडेगाव वनविभागाने केली आहे. सदरिल माल हा विनापरवानगी तोडला असलेबाबत संबधित शेतमालकने कबुल केले असून सदरिल माल हा बाहेर गावी विकनार असल्याबाबत सांगण्यात मालकादवारे आले. यावेळी कटाईचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई जुन्नरचे उपवनसरक्षक अमोल सातपुते सातपुते व सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, वनपाल इथापे, वनरक्षक कंधरकार यांनी केली. याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरु असून नमूद कायद्यानुसार संबधितावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.

सातगाव पठार भागातील पाणी आणि सिलिंगच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा ठिय्या

समर्थ भारत वृत्तसेवा पेठ (दिलीप धुमाळ) खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कलमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी, सातगाव पठार भागातील सिलिंग हटवण्यासाठी तसेच हुतात्मा बाबू गेनु जलाशयातील (दिंभे धरणातील) जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात घेऊन जाण्याच्या शासन निर्णयाविरोधात सातगाव पठार व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज (दि. १८) पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पंचवटी ढाबा, पेठ येथे शिवसेना गट नेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  उपस्थित शेतकऱ्यांना रविंद्र तोत्रे, ग्रामपंचयत सदस्य संजय पवळे अशोक धुमाळ, भाऊ सावंत, संजय कराळे, अशोक राक्षे, मोहन काळे, बी.आ. कराळे, गणपतराव  कराळे, मोहन काळे, प्रशांत पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी ३५ वर्ष सातगाव पठार भागाला कलमोडी पाणी मिळालं नाही तसेच सातगाव भागातील जमिनींना सिलिंग असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडीअडचणीचा सामना करावा लागतो या विषयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.  शेवटी शिवसेचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर या...

आदर्श सरपंच बबन बारवे यांना मतृशोक

समर्थ भारत वृत्तसेवा महळुंगे, ता. १८ : ठाकरवडी, चास (ता. आंबेगाव) चे आदर्श सरपंच बबन मारुती बारवे यांच्या मातोश्री ठकुबाई मारुती बारवे (वय ७५ वर्ष) यांचे मंगळवारी (दि. १८/०७/२०२३) पहाटे ४ वाजता निधन झाले असून, त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १८) दुपारी ३ वा. चास येथील घोड नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत पार पडेल. आदर्श सरपंच बबन मारुती बारवे यांच्या मातोश्रींच्या जाण्याने बारवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून; तालुक्यातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

बंद घर पाहून 2 लाख 84 हजार 923 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

मंचर प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने , असा 2 लाख 84 हजार 923 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे . याप्रकरणी मंचर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सविस्तर वृत्त अस कि लक्ष्मीबाई अशोक शिंदे वय ५८ वर्ष यांनी स्वतःच्या घरात दागिने आणि रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती . घराला बाहेरून कुलूप लावून त्या शेजारच्या खोलीत झोपल्या होत्या . सोमवारी सकाळी उठल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी घरात जाऊन पहिले असता पर्समधील ऐवज चोरीला गेल्याचे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला . लक्ष्मीबाई शिंदे यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे . ताबडतोब घटनास्थळी पोलिस हवालदार तानाजी मांडवे व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे यांनी भेट देवून तपास सुरू केला आहे . प...

मित्रांसोबत रानभाजी काढायला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  घोडेगाव प्रतिनिधी: आंबेगाव तालुक्यातील कानसे येथील अजय शशिकांत कराळे वय वर्ष 23 या   हा युवक जंगलात रानभाज्या काढण्यासाठी गेला होता . या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे . अजय कराळे , अक्षय कराळे व संतोष चपटे असे तिघे मिळून डोंगरामध्ये चाव्याचे कोंब व कोळूची भाजी काढण्यासाठी गेले होते . पाऊस पडत असल्याने डोंगर वाटा व कडे निसरडे झाले होते . यामध्ये एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो 25 ते 30 फूट खाली पडला . यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला व हात फॅक्चर झाला . सोबत असल्या दोघा मित्रांनी त्याला तात्काळ डोंगरावरून खाली आणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारा आधीच अजय कराळे याचा मृत्यू झाला होता . अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असल्याचे आंबेगाव तालुका बाजार समिती संचालक संदीप चपटे यांनी सांगितले .