समर्थ भारत वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त हिरे एक अभ्यासू आणी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित आहेत. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने यथोचित सहकार्य करण्यात येईल असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष बनसोडे यांनी म्हटले आहे.लोकहीतवादी सेवा संघ हा पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान हिरे यांनी आश्वासन दिले की शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटीबद्द राहू. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम असून, प्रशासनास सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आणि कृतज्ञ आहोत असेही यावेळी हिरे यांनी म्हटले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या भेटी प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, अखिलेश साळुंके व राकेश चन्नाल उपस्थित होते. लोकहीतवादी सेवा संघाच्या वतीने पोलीस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करू असे धर्मराज बनसोडे यांनी यावेळी म्हटले आहे.
लोकहितवादी सेवा संघाचे कार्य
लोकहितवादी सेवा संघाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी अन्न आणि औषधोपचार पुरवले जातात. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील निराधार निराश्रीत लोकांसाठी उबदार कपडे, ब्लॅंकेट्स आणि जेवणाची सोय केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.