Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे यांच्या वतीने वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संचचे वाटप

घोडेगाव प्रतिनिधी: पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" ही संस्था चालवत आहेत. समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात.  याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुण्यात आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन "श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच" चे वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.  समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद द...

कायदा सुव्यवस्थेसाठी आम्ही कटिबद्ध : डॉ. विशाल हिरे

समर्थ भारत वृत्तसेवा पिंपरी, ता. ६ :   लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त हिरे एक अभ्यासू आणी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित आहेत. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने यथोचित सहकार्य करण्यात येईल असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष बनसोडे यांनी म्हटले आहे. लोकहीतवादी सेवा संघ हा पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान हिरे यांनी आश्वासन दिले की शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटीबद्द राहू. पिंपरी चिंचवड आणि वाकड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम असून, प्रशासनास सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आणि कृतज्ञ आहोत असेही यावेळी हिरे यांनी म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या भेटी प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, अखिलेश साळुंके व राकेश चन्नाल उपस्थित होते. लोकहीतवादी सेवा संघा...

भीमाशंकरचे ऊस लागवड धोरण जाहीर

पारगाव प्रतिनिधी: दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक, आ. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२३-२४ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.  कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार १ जून २०२३ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.   कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्य...

पेमदऱ्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

आणे प्रतिनिधी:  आणे (ता. जुन्नर) येथून सुमारे चार किलोमिटर अंतरावर असलेल्या पेमदरा गावच्या हद्दीतील महान डोंगर परिसरात खंडू रामभाऊ दाते यांच्या शिवारात एक मृतदेह बुधवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला आढळून आला. त्याने ही माहिती पेमदरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील दाते दिली. त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात खबर दिली असता पो. उ. नि. अनिल पवार त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.  शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवता येण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांनी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड व त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. फड यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वी मृत झाली असून मृतदेह ओळखण्याच्या अवस्थेत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे प्रथमदर्शनी सांगता येत नाही. आणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. असीम आतार हे त्यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी या घ...