शिक्रापूर प्रतिनिधी:
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे रात्री सुरु असलेल्या एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोयता घेऊन लपलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून श्रीराम संतोष होले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे.
कान्हूर मेसाई येथे २६ मे
रोजी रात्री एका लग्नाची मिरवणूक सुरु होती, सदर मिरवणूक दरम्यान एक युवक लोखंडी कोयता घेऊन
लपला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक विजय चौधर, पोलीस शिपाई राहुल वाघमोडे यांनी सदर
ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक संशयित युवक पोलिसांना दिसला मात्र पोलीस आल्याचे
कळताच तो पळून जाऊ लागला यावेळी पोलिसांनी त्यांना पकडत अंगझडती घेतली असता
त्याच्या जवळ एक कोयता मिळून आला, पोलिसांनी सदर कोयता जप्त
केला असून याबाबत पोलीस शिपाई राहुल वाघमोडे सुर्यकांत वाघमोडे यांनी शिक्रापूर
पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रीराम संतोष होले
(वय २९ वर्षे रा. होलेवाडी ता. खेड जि. पुणे) याचेवर गुन्हे दाखल करत त्याला अटक
केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर करत आहेत.