लोणी धामणी
प्रतिनिधी:
लोणी (ता. आंबेगाव) येथे नुकत्याच पोलीस भरती झालेल्या अकरा युवक युवतींचा येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी लोणी संचलित पोलीस अकॅडमीच्या वतीने आणि खेड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, गृह विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोणी येथे माजी विद्यार्थी विकास
प्रबोधिनी लोणी संचलित पोलीस अकादमी लोणी व लोणी परिसरातील योग्य उत्तीर्ण पोलीस व
सैन्य दलामध्ये संधी मिळावी म्हणून भरतीपूर्व सराव प्रशिक्षणासाठी सन 2020 पासून मैदानी सराव व लेखी
परीक्षा वर्ग चालू करण्यात आले होते. 2021- 22 मध्ये भरती
प्रक्रिया बंद होती. चालू वर्षात 2023 मध्ये पोलीस विभागात भरती झालेल्या
अकरा विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोणी येथे आयोजीत केला होता. खेड विभागाचे पोलीस उपअधीक्षक
सुदर्शन पाटील, पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, गृह विभागाचे
सहसचिव डॉ. कैलास गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रकाश शिंदे, दीपक साकोरे,स्वप्निल वाळुंज, दीपक वाळुंज,संकेत ढगे, अभिषेक चौधरी,राहुल शिंदे, मुलींमध्ये करिष्मा आदक, पल्लवी वाळुंज, ललिता किथे, स्वप्नाली शिंदे, हे तरुण-तरुणी भरती झालेले आहेत. यावेळी यांना मार्गदर्शन व मैदानी सराव करून घेणारे शिक्षक माजी सैनिक सोमनाथ कदम, माजी सैनिक गुलाब गायकवाड व लेखी परीक्षेसाठी सराव करून घेणारे राहुल पडवळ सर प्रसाद चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रंगनाथ वाळुंज, प्रकाश वाळुंज तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच उद्धव लंके, कैलास गायकवाड, संतोष पडवळ, रोहिदास वाळुंज, प्राचार्य वेताळ सर, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक , चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव व ग्रामस्थ हजर होते. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. नवनीत शिनलकर यांनी आभार मानले.