कवठे येमाई प्रतिनिधी:
शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाची महत्वपूर्ण बैठक मलठण येथील राजयोग मंगल कार्यालय येथे शुक्रवार (दि.२६)
रोजी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी
राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी
त्यांनी केंद्र शासनावर टीका करताना केंद्र शासनाच्या साखर व कांदा निर्यात
बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.
जागतिक बाजारात साखरेला भाव
असूनही यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नाही. केंद्राच्या निर्यात
बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हीच परिस्थिती कांद्याची आहे. जगात
कांद्याला मागणी असूनही केंद्र सरकार महागाईचे अपयश झाकण्यासाठी ठराविक वर्गाला
खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा मिळू देत नाही व कांद्याची निर्यात करत नाही.
यावर्षी मोठ्या प्रमाणात रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात आल्या यामागील काळात
एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या काढल्या गेल्या नव्हत्या या मिरवणुकांना भारतीय जनता
पक्षाच्या अंगच्या संघटनांनी आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
इतिहास बदलण्याचे काम केले जात
आहे. चुकीच्या पाणी वाटप धोरणाला विरोध करण्यासाठी उपोषण करण्याची तयारी करण्याचे
आवाहन त्यांनी यावेळी केले प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यावेळी
सर्वच बाजूंनी त्यांनी केंद्र व राज्य
सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास
आघाडी व त्यांच्या सहकारी चा विजय निश्चित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार पोपटराव
गावडे, सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, सविता बगाटे, सरपंच
दामूआण्णा घोडे,
माजी पंचायत समिती सदस्य सुदाम
ईचके, अरुणाताई घोडे आदी मान्यवर व मोठ्या
प्रमाणावर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.