समर्थ भारत वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २: गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास नारायणगाव पोलिसांनी
ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस
निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी (ता.जुन्नर)
हद्दीतील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रा समोर खाकी रंगाच्या बुलेट
मोटरसायकलीवर एक व्यक्ती गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर
माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय
पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी
कारवाई केली.
पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल
शैलेश वाघमारे यांच्या पथकाने दोन पंच यांना कला केंद्रा जवळ पाठवून आरोपी सागर अरुण चौगुले (वय
२८ वर्षे) रा. शुक्रवार पेठ जुन्नर यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती केल्यानंतर
त्याच्याकडून ३० हजार किमतीचे एक सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल,२० हजार किमतीची
एम.एच.१४ के.के.२१४७ रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल, व २ लाख तीस हजार
किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे
हे करीत आहेत.