मंचर प्रतिनिधी:
ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ यांच्या मार्फत पंढरपूर येथे बांधल्या जाणाऱ्या नवीन धर्मशाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आणि मोरडे फुड्स अध्यक्ष हर्षल मोरडे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मंचर, शेवाळवाडी, निघोटवाडी सह वारकरी सेवा मंडळाचे 400पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते.
देवेंद्र शहा म्हणाले की, पंढरपूर येथे मंचरकरांनी साडे पाच गुंठे जागा
देणगीतून 55 लाख रुपयांना खरेदी केली आहे. एकूण नऊ हजार स्क्वेअरफुटचे बांधकाम लवकरच
पूर्ण होईल. प्रशस्त हॉल, बारा खोल्या, व्यापारी गाळे, स्वयंपाक
गृह, भोजनालय, स्वच्छता
गृह, बगीचा, पार्किंग
आदी सुविधा भाविकांना बाराही महिने उपलब्ध होणार आहेत. धर्मशाळेसाठी माजी
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक दानशुरांची मदत मिळणार आहे.”
मोरडे
म्हणाले, माझे
आजोबा (स्व) एकनाथ मोरडे व वडील चंद्रकांत मोरडे यांची इच्छा होती की मंचरकरांची
धर्मशाळा पंढरपूर मध्ये उभी रहावी. धर्मशाळा इमारतीचे भूमिपूजन हा माझ्या जीवनातील
सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.
याप्रसंगी
कामगार उपायुक्त भास्कर मोरडे, सरपंच नवनाथ निघोट, कांता बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, दत्ता थोरात, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले, नवनाथ डेरे, वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, भास्कर लोंढे गुरुजी
उपस्थित होते. वास्तूविशारद हेमंत पाटील, साजन इंदोरे व बांधकाम
व्यवसायिक राहुल अभंग येथील कामकाज पाहत आहे.
“धर्मशाळा बांधकामासाठी
आर्थिक मदत करावी असे आवाहन शहा यांनी केले. एक तासात तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या
देणग्या उत्स्फूर्तपणे जमा झाल्या. त्यामध्ये हर्षल मोरडे, देवेंद्र शहा यांनी
धनादेश व बाळासाहेब बेंडे,
संजय
थोरात, वामनराव
गांजाळे, बाबाजी
टेमगिरे, प्रशांत
बागल यांनी प्रत्येकी एक खोली बांधून देण्याचे जाहीर केले. 40 भाविकांनी प्रत्येकी
एक ते दोन लाख रुपये देणगी दिली. कन्या दिपिका योजने अंतर्गत 15 जणांनी प्रत्येकी 27 हजार रुपये देणगी दिली.”