ओतूर प्रतिनिधी:
ओतूर येथील भरबाजारात जुने एस.टी. बस स्थानक येथील विघ्नहर हॉस्पिटल कडे जाणारे रोडवर गुरुवारी (दि.२५) सायंकाळी पाच ते साडेपाच चे सुमारास चाकू हल्ला झाल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
आरोपी संतोष मारुती ठोसर (रा. मांदारणे ता.जून्नर जि.पुणे) याने त्याचे हातातील चाकूने बहिण वर्षा शांताराम खरात (वय ३२, जांभळे ता. अकोले जि. अहमदनगर) हिला तुला आता खल्लास करून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या बरगडीवर पायावर व हातावर चाकू खूसून वार केले. त्यात वर्षा ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी माऊली हॉस्पिटल आळेफाटा येथे नेले असता तेथील डॉक्टर ने तिला पुढील उपचार करता ससून रुग्णालय पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले.
याबाबत ज्योती अंबादास वाघमारे (रा. आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे तक्रार) यांनी केली आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर आकाश शेळके करीत आहेत.