शिक्रापूर प्रतिनिधी:
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सतरा वर्षीय मुलीला आत्महत्येची धमकी देऊन तिला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असताना न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली असून चेतन मारुती मलगुंडे असे सदर युवकाचे नाव आहे.
शिक्रापूर येथील सतरा वर्षीय मुलीची ओळख चेतन मलगुंडे या युवकासोबत झालेली असताना चेतन याने सदर युवतीला तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेल अशी धमकी देत मुलीला पळवून नेले होते, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना सदर युवतीला चेतन मलगुंडे याने बुलढाणा येथे नेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनतर पोलिसांनी बुलढाणा येथे जात दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान मुलीने
दिलेल्या जवाबावरून शिक्रापूर पोलिसांनी चेतन मारुती मलगुंडे वय १९ वर्षे रा.
ढोकसांगवी (ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध अपहरण, बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे
दाखल करत त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याची रवानगी
येरवडा कारागृहात केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व
पोलीस नाईक अमोल नलगे हे करत आहे.