वळती प्रतिनिधी: विलास भोर
घरफोडी करून चोरटयांनी घरातून २५ हजाराची चोरी करुन अंदाजे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. ही घटना सोमवारी रात्री नागापूर येथे घडली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पारगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागापूर घरफोडी करून रमेश दत्तात्रय पोहकर यांच्या घरातून चोरटयांनी अंदाजे अडीच ते तीन तोळा सोन्याचे दागिने व रोकड कॅश २५हजार रुपये चोरून नेले. आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश दत्तात्रय पोहकर यांनी याप्रकरणी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जाऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोकरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.
नागापूरच्या पूर्वेला असलेल्या मीना नदीवरच्या बंधाऱ्यावरचे चार दिवसापूर्वी अंदाजे २५ ते ३० ढापे चोरीला गेले आहेत गावामध्ये मोटर केबलची चोरी वारंवार होते व रात्री पण घर फोडी झाली आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी पकडून वारंवार होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यात याव्या अशी मागणी नागापूर गावचे सरपंच गणेश यादव यांनी केले आहे.