घोडेगाव प्रतिनिधी:
घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात आंबेगाव तालुक्याच्या खरीप हंगाम नियोजन आढावा
बैठकीला मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितत संपन्न झाली. घोडेगाव
आणि परिसरातल शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. रांजणगाव येथे असलेली
वेफर्सची कंपनी बंद होत आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कंपनी सुरु राहणे
अत्यंत गरजेचे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी लवकरच चर्चा केली
जाईल असही यावेळी मा. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी बोलताना सांगितलं.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील
काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. या पीकाच्या वाढीसाठी इथल्या
मातीचे परिक्षण आवश्यक असल्याचे चर्चेतून समोर आले आहे. या माती परिक्षणासाठी
भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माती परिक्षण प्रयोग शाळेचा वापर करण्याचा
करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला यासाठी लवकरच पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल
असही वळसे पाटील यादरम्यान बोले आहे.
खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी आंबेगाव
तालुक्यात दोन शेतकरी मेळावे आयोजित करण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. यंदा
पाऊस कमी पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने यासाठी शासनाकडून
पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मेळाव्यात या गोष्टीची
जगजागृती करण्यासाठी एक मेळावा आदिवासी भागात तर दुसरा मेळावा पूर्व भागात घेण्यात
येईल.
याशिवाय आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील हापुस
आंब्याचा दर्जा हा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा चांगला आहे. याला बाजारात मागणी
देखील चांगली आहे. या भागात आंबा लागवड वाढावी यासाठी आंब्याच्या बागा व झाडांची
अचूक आकडेवारी काढून आंबा लागवडीसाठी स्वतंत्र योजना केली जाईल.
शेतक-यांनी शेतीत युरियाचा वापर कमी केला
पाहिजे. यासाठी शेतक-यांना प्रषिक्षण दिले जावे आणि यासोबतच युरीयाची साठेबाजी व
युरिआबरोबर औषधे खपविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या
बैठकीत करण्यात आली. यावेळी विविध विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.