मंचर प्रतिनिधी:
मंचर पोलीस स्टेशन हद्दीत दि.08 मे 2023 रोजी अंजनाबाई प्रभाकर बाणखेले वय 78 वर्शे रा.मंचर बाणखेले मळा ता.आंबेगाव जि.पुणे या ज्येष्ठ महीला बेपत्ता झालेबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार आली होती.
त्या अनुषंगाने सदर महिलेचा मंचर पोलीसांनी आजुबाजुच्या परीसरात तसेच त्यांच्या नातेवाइंकाकडे शोध घेतला. परंतु सदर महिला मिळुन येत नसल्याने पोलीसांनी त्यांचेकडे त्या दिवशी येणारे जाणारे सर्व इसमांची चौकशी सुरू केली. त्यामध्ये एक गजानन नावाचा इसम त्यांच्याकडे कामासाठी अधुन मधुन येत जात असल्याची माहीती मिळाली. त्यावेळी गजानन गजानन यांना यांना संपर्क साधला असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता आणि सुरत येथे असल्याचे सांगत होता. त्यावेळी त्याच्या मालकाला विश्वासात घेवुन त्याचेबाबत खात्री केली असता गजानन याने तो सुरत येथे सासरवाडीला गेल्याचे सांगितले. त्याअनुशंगाने त्याची चौकशी केली असता तो घटना घडली त्यावेळी स्पाॅटला मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले दरम्यान सदर महिलेचा काहीएक ठावठिकाणा मिळुन येत नव्हता त्यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश होडगर आणि त्यांचे सहकारी, पो.ह राजेश नलावडे, पो.ना सोमनाथ वाफगांवकर, पो.हवा संजय नाडेकर, पो.काॅ अजित पवार आणि अविनाश दळवी यांनी महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने घराचे मागील सर्व भाग पिंजुन काढला त्यावेळी घराचे मागे असणारे अष्विन बाणखेले यांचे हत्ती गवताचे शेतात अंजनाबाई यांची मयत बाॅडी मिळुन आली. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय मंचर येथे नेण्यात आला. सदर महिलेचा संशयित मृत्यु झाल्याचे समजुन आल्यावर मंचर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरूद्व गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पुढील तपास मंचर पोलीस निरीक्षक सतीश होडगर हे करीत असताना तपासादरम्यान सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांकडे चौकशी केली. असता गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली सदर महिला बेपत्ता होण्याअगोदर एक गजानन नावाची व्यक्ती सदर मृत महिला यांचेकडे मोलमजुरी करत होती. आणि ती व्यक्ती महिला बेपत्ता झाल्यापासुन फरार झाली आहे. सदर व्यक्तीनेच महिलेचा खुन केला आहे.अशी खात्री झाल्यावर पोलीसांनी सदर व्यक्ती सुरत गुजरात येथुन ताब्यात घेवुन अवघ्या काही तासांच्या आत खुनाच्या गुन्हयाची उकल केलेली असुन सदर आरोपीचे नांव गजानन बुद्धजन बांगर वय 31 वर्ष रा.काकनवाडा ता.सग्रामपुर जि.बुलढाना यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केली असुन त्यास मा.प्रथमवर्ग न्यायालय घोडेगाव येथे हजर केले असता मा न्यायालयाने त्यास 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली असुन पुढील तपास पो.नि. सतीश होडगर हे करीत आहेत.
सदर गुन्हयाची महत्वपुर्ण उकल होणेकामी मा. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सतीश होडगर स.पो.नि बालाजी कांबळे, पो.ह राजेंद्र हिले, पो.ह. राजेष नलावडे, पो.ना सोमनाथ वाफगांवकर, पो.ह. संजय नाडेकर, पो. काॅ अजित पवार आणि अविनाश दळवी आणि पो.काॅ योगेश रोडे यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावलेली आहे.