मंचर प्रतिनिधी:
दोघांमध्ये चाललेली चर्चा माझ्याविषयी आहे असा गैरसमज करून घेत 61 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ आणि किरकोळ व गंभीर स्वरूपाची मारहाण केले आहे.या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 मे 2023 रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शेवाळवाडी गावच्या हद्दीत अवसरी फाट्यावरील हॉटेल पायल प्लाझा च्या समोर फिर्यादी सोमनाथ धोंडीभाऊ शिंदे (वय वर्ष 61 राहणार अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) हे तुषार अनंत शिंदे यांच्याशी बोलत असताना फिर्यादी तुषार यांना काहीतरी सांगत आहे असा गैरसमज करून आरोपी सुभाष खंडू भोर (रा. भोरवाडी, लंकेमळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) याने फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर फिर्यादी हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर सुभाष भोर याने तेथे पडलेल्या विटेचा तुकडा हातात घेऊन फिर्यादी यांच्या डाव्या हातावर आणि डोक्यात मारून त्यांना किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत केली आहे. आरोपी सुभाष खंडू भोर यांच्या विरोधात सोमनाथ धोंडीभाऊ शिंदे यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. हवा. मांडवे हे करत आहे.