मंचर प्रतिनिधी:
पेठ ता. आंबेगाव जि. पुणे येथे रानवारा हॉटेल समोर स्प्लेंडर मोटार सायकल आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला असून या अपघातात बाळू तुकाराम सोनवणे वय वर्ष ५५ यांचा मृत्यु झाला आहे. याबाबत मंचर पोलिस स्टेशनमध्ये आयशर टेम्पो चालकावर दत्ता बाळू सोनवणे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
13 मे 2023 रोजी दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास पेठ ता. आंबेगाव जि पुणे रानवारा हॉटेल समोर पुणे- नाशिक हायवे वर मयत बाळू तुकाराम सोनवणे (वय वर्ष 55 राहणार शिंगवे पारगाव, सोनवणे वस्ती) यांच्याकडे असणाऱ्या हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH12CU6075 ह्या मोटार सायकल वरून नाशिक बाजूकडून पुण्याला बाजूला जाणारा हायवे रोडची लेनने मोटार सायकल चालवत असताना पुण्यावरून नाशिकच्या बाजूकडे आयशर टेम्पो क्रमांक MH15DK6560 ह्या टेम्पोवरील चालक लक्ष्मण विष्णू सहाने (रा. निरामय संकुल रो हाउस नं 15 आंबडगाव ता. जि. नाशिक) याने याच्या ताब्यातील आयशर टेम्पो याच्या अविचाराने आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत टेम्पो चालवत होता. टेम्पो अचानक नाशिकवरून पुण्याला जाणाऱ्या लेनमध्ये घेऊन गेल्याने मयत बाळू तुकाराम सोनवणे यांच्या मोटार सायकलला जोरदार धक्का बसला आणि अपघात झाला.
या
अपघातात मयत बाळू सोनवणे यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांचा
मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मोटार सायकलचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान केले आहे.
आयशर टेम्पो क्रमांक MH15DK6560 ह्या टेम्पोवरील चालक लक्ष्मण विष्णू सहाने याच्या
विरोधात मंचर पोलिस स्टेशनमध्ये दत्ता बाळू सोनवणे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
पुढील तपास पो. हवा. जांभळे हे करत आहे.