मंचर प्रतिनिधी:
मंचर एसटी स्टॅन्डवरून एसटीमध्ये बसलेल्या महिलेचे चालू एसटीमधून सोन्याचे
दागिने केले चोरांनी लंपास 160,000/- किंमतीचा मुद्देमाल चालू एसटीमधून अज्ञात चोरांनी
लांबविला असून अज्ञात चोरा विरुद्ध मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
13 मे 2023 रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास फिर्यादी ललिता महादेव
गावडे (वय वर्ष 45 रा. घाटकोपर ईस्ट हरीपाडा गंगाप्रसाद चाळ रूम नं 2सध्या रा.
गावडेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) ह्या मंचर एसटी स्टॅन्डवरून एसटीमध्ये बसलेल्या
असतना चालू एसटीमधून फिर्यादी ललिता महादेव गावडे यांच्या बॅग मधील डब्बी
मध्ये ठेवलेले 160,000/- किंमतीचे दागिने
अज्ञात चोरांनी लंपास केले आहे.
अज्ञात चोरांनी चोरी केलेले दागिने:
1)30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसु, जु .वा कि अ. - 120,000/-रूपये
2)7
ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल जु .वा कि अ. - 28,000/-रूपये
3)3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके जु .वा कि अ - 12000/- रू
असे एकूण 160,000/-रू किंमतीचे सोन्याचे दागिने चालू
एसटीमधून लांबविल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरा विरुद्ध मंचर पोलिस स्टेशनमध्ये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हवा. हिले हे करत आहेत.