पारगाव प्रतिनिधी: बेल्हे-जेजुरी महामार्गावर पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास इको मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. मोटारीमधील दोघांचे नशीब बलवत्तर म्हणून फक्त किरकोळ जखमांवर निभावले, मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले.बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास इको मोटार क्र. एम.एच.१२ आर.वाय. ३५१७ बेल्हे येथून लोणी गावाकडे जात असताना पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडीफाट्याच्या पुढे खडकवाडीच्या बाजूला मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली व चारही चाके वर झाली. या अपघातात गाडीमधील दोघांचे नशीब बलवत्तर म्हणून फक्त किरकोळ जखमावर निभावले. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले. दोन्ही जखमींचे गाव वडगावपीरचे आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गाचे काम चांगले झाल्याने या रस्त्यावरून वाहनांची ये- जा वाढली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर आणि नीलेश पडवळ यांनी केली. वाहनचालकांनीही वाहनाचा वेग मर्यादित ठेऊन वाहतुकीचे...
समर्थ भारत माध्यम समूह