समर्थ भारत वृत्तसेवा
आळेफाटा, ता. २८: आळेफाटा येथील नगर रोडवर असलेल्या पसायदान कॉम्प्लेक्स या ठिकाणाहुन दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास भिमाशंकर सखाराम आवटे यांच्या मालकीच्या त्यांनी पार्किंग करून ठेवलेले महिंद्रा बोलेरो कंपनीचे केन क्र. एमएच ०४ डीटी ०२८३ हे कोणातरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना इतर चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास आळेफाटा पोलीसांनी अटक केली असून अट्टल गुन्हेगाराकडून १,४०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दाखल गुन्हयामध्ये क्रेन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात असल्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफची पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवुन त्यानुसार यातील अज्ञात आरोपींचा माग काढत राजु बाबुराव जावळकर (वय ५५ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्टमेट, फ्लॅट नं. ४०३, डोणजेफाटा ता. हवेली जि. पुणे) यांस पुणे या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवून सदरचे क्रेन हे अंगद पुनम यादव (सध्या रा. कळंबोली, मुंबई, मुळ रा. आझमगड, राज्य उत्तरप्रदेश) यांस विकले असल्याचे सांगितले आहे.
आरोपीने गुन्हयात
वापरलेले वाहन स्कॉपिओ वाहन क्र. एम. एच. १६/अ.जी. ४०४४ तसेच सदर गुन्हयातील क्रेन
विकलेल्या पोटी आलेले ४०,०००/रूपये असा एकुण १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल
पोलीसांनी हस्तगत करून ती जप्त केली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भिमा लोंढे, संजय शिंगाडे, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.