समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, ता. २६: सणसवाडी (ता. शिरुर) येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असेलल्या ठिकाणहून रात्रीच्या सुमारास चार अज्ञात युवकांनी काही मशिनरी व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी येथे ड्यूरो शॉक्स कंपनीच्या बांधकाम सुरु असल्याने सदर ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले असल्याने २५ एप्रील रोजी रात्रीच्या सुमारास चार युवक सदर ठिकाणी असल्याचे सुरक्षा रक्षक ओम शिंदे व अनिल राठोड यांना दिसले त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या युवकांना आवाज दिला असता ते पळून जावू लागल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चारही युवक अंधारात पळून गेले.
सुरक्षा रक्षकांनी कंपनीतील सर्व साहित्यांची पाहणी केली असता बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचे केबल, मशीन असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत ओम मारुती शिंदे वय १९ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव करत आहेत.