समर्थ भारत वृत्तसेवा
शिक्रापूर, ता. २८: मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून युवकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे प्रसाद गोरक्ष जाधव व सचिन गोरक्ष जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवगण फराटा येथील निलेश जाधव हे त्यांच्या त्याब्यातील चारचाकी वाहनातून खाली उतरत असरणा प्रसाद जाधव व सचिन जाधव त्याच्या जवळ आले आणि आमची जमीन आम्हाला कधी देणार असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली, दरम्यान सचिन याने हातात दांडके घेऊन निलेश याच्या डोक्यात मारून जखमी केले, यावेळी दोघांनी देखील आमच्या नादाला लागला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी देखील निलेशला दिली.
याबाबत निलेश आनंदराव जाधव (वय ३६ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी प्रसाद गोरक्ष जाधव व सचिन गोरक्ष जाधव (दोघे रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गवळी हे करत आहे.