समर्थ भारत वृत्तसेवा
कवठे / टाकळी हाजी, ता.
२७: कवठे येमाई - मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत शिवाजी मारुती
जाधव ( वय ६५ वर्ष ) रा.पिंपरखेड यांच्या टू व्हीलरला अज्ञात वाहनाने जोरदार धडक
दिल्याने शिवाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तश्राव होऊन त्यांचा
अपघातात मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे.
शिवाजी जाधव हे पिंपरखेडवरुन कवठेमार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे होंडा शाईन (क्रं एम.एच१४ई.टी. ६५३९) या गाडीवरून चालले होते. अष्टविनायक रस्त्यावर रावडेवाडी येथील पराग अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला आहे. शाईन गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठ्याच्या बाजूने येणारी वाहने दिसत नाही. तसेच सदर ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने वळण घेताना अपघात होत आहेत.
नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम
पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने पळत आहे. वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालवणे
गरजेचे असून स्पीड बेकर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गडदरे,सरपंच भाऊसाहेब
किठे, व नागरीकांनी केली आहे.
याच अष्टविनायक रस्त्यावर भाऊसाहेब चव्हाण रा. शिरसगाव काटा यांचा दि. २२ एप्रिल रोजी टू व्हीलरवर शिंदेवाडीतील पीराचा दर्गा येथे अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या अष्टविनायक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून या रस्त्यावर अनेक जणांचे जीव गेले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.