Skip to main content

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा : वळसे पाटील

समर्थ भारत वृत्तसेवा

मंचर, ता. २६: मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करत असताना माजी गृहमंत्री दिलीपराव पाटील यांनी माजी सभापती देवदत्त निकम यांच्यावर टीका टाळत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर माजी सभापती देवदत्त निकम यांनी इतर नाराज उमेदवारांना सोबत घेत स्वतंत्र पॅनल उभे करत थेट महाविकास आघाडीलाच आव्हान दिले होते. यानंतर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी देवदत्त निकम यांचे पक्षातून निलंबन करणार असल्याचे म्हटले होते. परंतु देवदत्त निकम यांना निलंबित करून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होणारे नुकसान आणि भविष्यातील आवाहन याचा विचार करून पक्षाने तूर्तास निलंबन टाळले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मेळाव्याला बाजार समितीच्या मतदारांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी जास्त असल्याची चर्चा आहे. 

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील काय बोलतात; याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. देवदत्त निकम यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊ शकते आणि याची घोषणा माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील करतील अशी कुजबुज सुरू असताना दिलीपराव वळसे पाटील यांनी मात्र देवदत्त निकम यांच्यावर टीका करणे टाळले. 

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे, लाला अर्बन बँकेचे चेअरमन युवराज बाणखेले, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख सुरेश भोर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन भोर आदी मान्यवर उपस्थित होते. 

देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेसला जड जाऊ शकतात

माजी सभापती देवदत्त निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक बलाढ्य नेते आहेत. निकम यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. त्यांना पक्षातून निलंबित करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होऊ शकते याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असल्याने माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी निकम यांच्यावर टीका करणे टाळले असल्याचे बोलले जात आहे.

माझी सभापती देवदत्त निकम यांनी मला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा किंवा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा उमेदवार घोषित करा अशी अट घातली होती. अशा अटींवर पक्ष चालत नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेतात. त्या निर्णयांवर पक्ष चालतो. देवदत्त निकम यांनी माझा फोटो लावून प्रचार सुरू केला असला तरी सुद्धा मी ज्या उमेदवारांची नावे वाचून दाखवली आहेत त्या महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करा. (दिलीपराव वळसे पाटील, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र, राज्य) 

माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील सर्वच नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मिळत प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी काहीही कमी केलेले नाही. माझी सभापती देवदत्त निकम यांना दोन वेळा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केले. एकदा बाजार समितीचे सभापती केले. त्यानंतर पुन्हा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर संचालक केले. तरीदेखील निकम यांनी पक्षाचा आदेश धुडकवून लावला. त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे गद्दारांना माफी मिळणार नाही. (विष्णूकाका हिंगे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस)


 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...