समर्थ भारत वृत्तसेवा
शिरूर / टाकळी हाजी, ता. २६ : शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून
यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले असून पुन्हा
रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवरदुचाकीवर आलेल्या दोन
अज्ञात चोरटयांनी उज्वला प्रवीण पाटील (वय 35 वर्ष) या महीलेच्या गळयातील १,२०,००० रु. किमतीचे सोन्याचे दोन
तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याच्या पट्टीचे मनी मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेले आहे.
मंगळवारी (दि. २५) सकाळी ७.३० च्या सुमारास शिरूर गावच्या रामलिंग हद्दीत ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर उज्वला पाटील या किराणा दुकानातून साहित्य घेऊन परत घराकडे पायी जात असताना समोरून स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम .एच. २२ ए .क्यू ९०७० वरून दोन अनोळखी इसम अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातीलदोघांनी समोरून येऊन मोटार सायकल स्लो करून मोटरसायकल वरील मागे बसलेल्या इसमाने उज्वला पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण किंमत अंदाजे रू १, २०, ००० रुपये किमतीचे दागिने हाताने धरून जोराने हिसकावून ओढून जबरीने चोरून घेऊन पळून गेले आहेत.
ही बाब किराणा दुकानदाराने पाहताच चोरट्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंरतू चोरटे गाडी सोडून पळून शेजारील उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद उज्वला पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.