समर्थ भारत वृत्तसेवा
कवठे येमाई, ता.२७: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जिल्हा परिषदेच्या ३०/५४
ग्रामीण रस्ते निधीतून कवठे ते लाखनगाव या रस्त्याचे भूमिपूजन कवठे टाकळी
जिल्हा परिषद गटातील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्वच प्रमुख
पक्षातील कार्यकर्ते व नेते हजर होते.
या भागातील अनेक
दिवसांपासूनचा या रस्त्याचा प्रश्न हा लवकरच सोडविला जाणार असल्याने परिसरातून
आनंद व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कवठे गावठाण (पवार
राजवाडा) ते लाखणगाव रस्त्याला जोडणारा सुमारे १२५ मीटर लांब व ३ मीटर रुंदीच्या
कच्चा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.(२७) रोजी करण्यात आले. या
रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या ३० / ५४ ग्रामीण रस्ते निधीतून १५ लाख
रुपये निधी टाकण्यात आला.
यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, कवठे सरपंच सुनिता पोकळे, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, माजी सरपंच बबनराव पोकळे, रामदास सांडभोर, अरुण मुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे, मिठूलाल बाफना, काशिनाथ पोकळे, फक्कड सांडभोर, पोपट रोहिले, कवठे सोसायटी अध्यक्ष विक्रम इचके, तंटामुक्ती उपाध्यक्ष बबुशा पाटील कांदळकर, सोसायटी संचालक कैलास बच्चे, बाळासाहेब ईचके, एकनाथ सांडभोर, रितेश शहा, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब घोडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव, मधुकर रोकडे, राजेंद्र इचके, युवानेते पांडुरंग भोर, सचिन बोऱ्हाडे, बाळशिराम मुंजाळ, किसनराव हिलाळ, निलेश पोकळे,अविनाश पोकळे, मधुकर इचके, स्वप्निल घोडे, समीर पठाण, सुदर्शन बोराडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गणेश रत्नपारखी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जानकु मुंजाळ, सिने निर्माते भरत रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.