समर्थ भारत वृत्तसेवा
मंचर, ता. २८ : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली असून, तब्बल ९७.८१% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण चार मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातील १५५८ मतदारांपैकी १५२४ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.रोकडे यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी १०.३० वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद चंद्र पवार सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी पार पडेल. माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी ने उमेदवारी नाकारल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आंबेगाव विधानसभा आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची दिशा, या बाजार समितीच्या निवडणुकीवर अवलंबून आहे.
चार
केंद्रांवर झालेले मतदान
१)
मंचर
सोसायटी : २४६ पैकी
२४३
ग्रामपंचायत : २५६ पैकी २५१
२)
घोडेगाव
सोसायटी : ११८ पैकी
११७
ग्रामपंचायत : १६१ पैकी १५५
३)
निरगुडसर
सोसायटी : २६५ पैकी
२५३
ग्रामपंचायत : २१३ पैकी २०६
४)
डिंभे
सोसायटी : ९२ पैकी ८८
ग्रामपंचायत : २०८ पैकी २०२
चौकट
:
विरोधकांमुळे
निरगुडसर हॉट केंद्र
माजी सभापती देवदत्त निकम यांच्या बंडाळीमुळे नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे वातावरण चांगले तापलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये आंबेगाव तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी निरगुडसर केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये माजी सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
वळसे
पाटील यांच्या विरोधातील सर्वपक्षीयांचे मनोमिलन?
महाविकास आघाडीच्या विरोधात लढलेले माजी सभापती देवदत्त निकम आणि महायुतीच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची मैफल केंद्राबाहेर जमली होती. त्यामुळे यापुढील राजकारण नेमके कुठल्या वळणावर जाते याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सेना भाजपा आणि देवदत्त निकम यांच्या एकत्रित ताकदीचा विचार केल्यास, आगामी विधानसभा तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जड जाऊ शकते. मात्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतरच आंबेगावच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होईल.