Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

क्रेनची चोरी करणारा अट्टल गुन्हेगार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात.

समर्थ भारत वृत्तसेवा आळेफाटा , ता. २८:   आळेफाटा येथील नगर रोडवर असलेल्या     पसायदान कॉम्प्लेक्स या ठिकाणाहुन दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास भिमाशंकर सखाराम आवटे यांच्या मालकीच्या त्यांनी पार्किंग करून ठेवलेले महिंद्रा बोलेरो कंपनीचे केन क्र. एमएच ०४ डीटी ०२८३ हे   कोणातरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना इतर   चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास आळेफाटा पोलीसांनी अटक केली असून अट्टल गुन्हेगाराकडून १ , ४० , ०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   दाखल गुन्हयामध्ये क्रेन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात असल्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफची पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती ...

जमिनीच्या वादातून युवकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २८:   मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून युवकाला शिवीगाळ , दमदाटी करत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे प्रसाद गोरक्ष जाधव व सचिन गोरक्ष जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                    मांडवगण फराटा येथील निलेश जाधव हे त्यांच्या त्याब्यातील चारचाकी वाहनातून खाली उतरत असरणा प्रसाद जाधव व सचिन जाधव त्याच्या जवळ आले आणि आमची जमीन आम्हाला कधी देणार असे म्हणून शिवीगाळ , दमदाटी करत हाताने मारहाण केली , दरम्यान सचिन याने हातात दांडके घेऊन निलेश याच्या डोक्यात मारून जखमी केले , यावेळी दोघांनी देखील आमच्या नादाला लागला तर जीवे मारून टाकीन अशी धमकी देखील निलेशला दिली.     याबाबत निलेश आनंदराव जाधव (वय ३६ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी प्रसाद गोरक्ष जाधव व सचिन गोरक्ष जाधव (दोघे र...

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 97.81% मतदान.

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर , ता. २८ :   संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली असून , तब्बल ९७.८१% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण चार मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातील १५५८ मतदारांपैकी १५२४ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.रोकडे यांनी दिली.   मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या मतदानानंतर शनिवारी सकाळी १०.३० वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद चंद्र पवार सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी पार पडेल. माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी ने उमेदवारी नाकारल्यानंतर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आंबेगाव विधानसभा आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची दिशा , या बाजार समितीच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. चार केंद्रांवर झालेले मतदान १) मंचर   सोसायटी : २४६ पैकी २४३ ग्रामपंचायत : २५६ पैकी २५१ २) घोडेगाव सोसायटी : ११८ पैकी ११७ ग्रामपंचाय...

कवठे येमाई - लाखनगावला जोडणाऱ्या सिमेंट रोडचे भूमिपूजन.

समर्थ भारत वृत्तसेवा कवठे येमाई , ता.२७:   शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जिल्हा परिषदेच्या ३०/५४ ग्रामीण रस्ते निधीतून कवठे ते लाखनगाव या रस्त्याचे भूमिपूजन कवठे टाकळी जिल्हा परिषद गटातील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्वच प्रमुख पक्षातील कार्यकर्ते व नेते हजर होते.   या भागातील अनेक दिवसांपासूनचा या रस्त्याचा प्रश्न हा लवकरच सोडविला जाणार असल्याने परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कवठे गावठाण (पवार राजवाडा) ते लाखणगाव रस्त्याला जोडणारा सुमारे १२५ मीटर लांब व ३ मीटर रुंदीच्या कच्चा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार दि.(२७) रोजी करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या ३० / ५४ ग्रामीण रस्ते निधीतून १५ लाख रुपये निधी टाकण्यात आला.          यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे , शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे , कवठे सरपंच सुनिता पोकळे , उपसरपंच विठ्ठल मुंजाळ , ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ , माजी सरपं...

उदापूर मध्ये बिबट्याची दहशत भर दिवसा मेंढरांच्या कळपावर केला हल्ला.

समर्थ भारत वृत्तसेवा. बनकर फाटा , ता.२७ :   उदापूर येथील कुलवडेमळा , अमुपमळा , मोरेशेत , चौधरी वाडी , या वाड्या वस्त्यांवर बिबट्याने गेली आठ ते दहा दिवसांपासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे सहा दिवसांपूर्वीच अमुपमळा येथील हनुमंत अमुप यांच्या वासरावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला होता. तेव्हापासून या परिसरात बिबट्याने ठाण मांडले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहे.     दिनांक २७ रोजी भर दुपारीच कुलवडे मळा येथील भेंडीखाली संजय चोरआंबले यांचा मेंढ्यांचा कळप सावलीला बसला असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला यावेळी प्रसंगअवधान राखत मेंढपाळाने बिबट्याच्या दिशेने काठी भिरकावली आणि आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु यात एक मेंढरू व वासरू हे किरकोळ जखमी झाले आहे.    याबाबतची माहिती वन अधिकारी वैभव काकडे यांना दिली असता यांनी तातडीने घटनास्थळी टीम पाठवून पाहणी केली व अमुपमळा येथे पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच कुलवडेमळा येथील संदीप कुलवडे , संपत कुलवडे , सचिन कुलवडे , ...

जामीन केल्याचे पैसे मागत जीवघेणा हल्ला.

समर्थ भारत वृत्तसेवा शिरूर / शिक्रापूर ता. २७ :   शिरुर शहरातील प्रितम प्रकाशनगर येथील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीमध्ये इसमाला जुन्या गुन्ह्यात जामीन करून दिल्याचे पैसे मागत त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करत इसमासह त्याच्या पत्नी व मुलीला जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे शरद तुकाराम बांदल याच्या सह त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर शहरातील प्रितम प्रकाशनगर येथील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीमध्ये अंकुश बांदल हे त्यांच्या पत्नी व मुलीसह असताना शरद बांदल हा त्याच्या तीन साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या वेरना कारमधून आला आणि अंकुश यांना मी तुझा जुन्या गुन्हयात जामीन करून दिलाय त्याचे पैसे मला   आत्ताचे   आत्ता   पाहीजेत.   नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून अंकुश बांदल यांना जिवे मारण्याचे हेतूने हातातील चाकूने अंकुश यांच्या तोंडावर , डोक्यात वार केले तर शरद यांच्या साथीदारांनी लाकडी स्टंपने अंकुश यांना मारहाण केली. यावेळी अंकुश यांची पत्नी मनीषा व मुलगी श्रेया मध्ये आले असताना मारहाण कर...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू.

समर्थ भारत वृत्तसेवा कवठे / टाकळी हाजी , ता. २७:   कवठे येमाई - मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत शिवाजी मारुती जाधव ( वय ६५ वर्ष ) रा.पिंपरखेड यांच्या टू व्हीलरला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शिवाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तश्राव होऊन त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे. शिवाजी जाधव हे पिंपरखेडवरुन कवठेमार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे होंडा शाईन (क्रं एम.एच१४ई.टी. ६५३९) या गाडीवरून चालले होते. अष्टविनायक रस्त्यावर रावडेवाडी येथील पराग अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला आहे. शाईन गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठ्याच्या बाजूने येणारी वाहने दिसत नाही. तसेच सदर ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने वळण घेताना अपघात होत आहेत.     नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने पळत आहे. वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालवणे गरजेचे असून स्पीड बेकर बसवण्याची मागणी   सामाजिक कार्यकर्ते दत्ता गडदरे , सरपंच भाऊसाहेब किठे , व नागरी...

शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २७ :   विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी , दिपक दत्तात्रय गवारी , महेश दत्तात्रय गवारी , संभाजी पांडुरंग गवारी , भूषण गुरुनाथ गवारी , गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.                               विठ्ठलवाडी येथील नवनाथ हंबीर हे शेतात काम करत असताना योगेश गवारी व त्यांचे साथीदार तीन ट्रॅक्टर घेऊन हंबीर यांच्या शेतात आले. त्यांनी शेतातील जनावरांचे गवत , टोमॅटो , कोथंबीर हे पिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान केले. यावेळी नवनाथ हंबीर व त्यांच्या कुटुंबियांना ट्रॅक्टर घेऊन आलेल्या इसमांना अडवण्याचा प्रयत्न करत तुम्ही पिकांचे ट्रॅक्टरने नुकसान का करता असे म्हटले असता हंबीर यांच्यासह त्यांचे भाऊ , भावजय ,...

महाविकास आघाडीचा हायटेक प्रचार, तर देवदत्त निकम मतदारांच्या घराघरात पोहोचले.

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर , ता. २७ :   मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपला. उद्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तालुक्यातील विविध केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवदत्त निकम यांच्या बंडखोरीनंतर बाजार समितीच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर महाविकास आघाडी आणि देवदत्त निकम यांच्या पॅनलने जोरदार प्रचार केला. सेना भाजपही प्रचारात आघाडीवर राहिली. त्यानंतर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. माजी सभापती देवदत्त निकम यांनी मतदारांच्या घराघरात बांधावर आणि शिवारात जाऊन प्रचार केला. सेना (शिंदे गट) भाजप आणि स्वाभिमानीच्या वतीनेही अरुण गिरे यांनी घराघरात जाऊन प्रचार केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनी विविध गावातील आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून मतदारांना चौकात बोलवून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना संपर्क केला. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या मतदार चौकात जमविण्याच्या आग्रहाखातर गावातील कार्यकर्त्यांनी मतदार कमी आणि कार्यकर्तेच जास्त जमवले. नेते मंडळ...

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत खारओढा येथे कचऱ्याचे साम्राज्य.

समर्थ भारत वृत्तसेवा शिरुर (तेजस फडके) , ता. २६:   शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे आसपासचे रहिवासी मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले असुन रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असुन ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतची हद्द मोठी असून काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रामलिंगच्या बाजूला राहणारे रहिवासी घरातील सर्व ओला-सुका कचरा रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा या ठिकाणी टाकत असून त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठत आहे. तसेच हे ढिग साठल्याने दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो कचरा पेटवुन दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धुराचा त्रास होत आहे. याबाबत शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पोपट केदारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की , लो...

महिलेच्या गळयातील १, २०, ००० रुपयांचे दागिने हिसकाविले.

समर्थ भारत वृत्तसेवा शिरूर / टाकळी हाजी , ता. २६ :   शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले असून पुन्हा रामलिंग   ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवरदुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी उज्वला प्रवीण पाटील (वय 35 वर्ष) या महीलेच्या गळयातील   १ , २० , ००० रु. किमतीचे   सोन्याचे दोन तोळ्याचे मिनी गंठण , सोन्याच्या पट्टीचे मनी मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेले आहे. मंगळवारी (दि. २५) सकाळी ७.३० च्या   सुमारास शिरूर   गावच्या रामलिंग हद्दीत ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर उज्वला पाटील या किराणा दुकानातून साहित्य घेऊन परत घराकडे पायी जात असताना समोरून स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम .एच. २२ ए .क्यू   ९०७० वरून दोन अनोळखी   इसम अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातीलदोघांनी समोरून येऊन मोटार सायकल स्लो करून मोटरसायकल वरील मागे बसलेल्या इसमाने उज्वला पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण किंमत अंदाजे रू १ , २० , ००० रुपये किमतीचे दागिने हाताने धरून ...

शिक्रापूर ग्रामपंचायतचे राजकारण वेगळ्या वळणावर.

समर्थ भारत वृत्तसेवा शिक्रापूर , ता. २६:   शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच मांढरे गटाचा अशी स्थिती असताना नुकतेच मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आलेले असताना उपसरपंच पदाच्या निवडणुकीवेळीच अचानक सरपंच रुग्णालयात दाखल झाले असल्याने शिक्रापूरचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचून मंगलदास बांदल व आबा मांढरे एकत्र आल्याने गावात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे.                            शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने ते एकच राहणार असताना सध्या सरपंच एका गटाचा तर उपसरपंच एका गटाचा अशी स्थिती असताना सरपंच बांदल गटाचा तर उपसरपंच आबासाहेब करंजे , बापूसाहेब जकाते व आबाराजे मांढरे यांच्या गटाचा राहिलेला आहे. मात्र नुकतेच विरोधक असलेले मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे दोघे एकत्र आले असताना आज नव्याने उपसरपंच पदाची निवडणूक होणार असताना मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे यांनी मिळून त्यांच्या गटाचा उपसरपंच करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र एक सदस्य कमी असल्याने सरपंच गटाचा उपस...

जमिन मोजणीच्या वादातून नगरसेविकेच्या पतीला मारहाण.

समर्थ भारत वृत्तसेवा   शिक्रापूर , ता. २६:   शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील कासारी फाटा येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून नगरसेविका महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मनोज दंडवते , अजय झेंडे , राकेश शेलार , प्रशांत शिंदे , बाजी हिंगमिरी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.                         शिक्रापूरजवळ कासारी फाटा परिसरात गणेश पवार यांनी बाजीराव दंडवते यांच्याकडून काही जमीन विकत घेतलेली होती. त्या जमिनीची मोजणी होऊन महसूल विभागाच्या वतीने हद्द कायम करुन देण्यात येणार असल्याने गणेश पवार व महेश गलांडे दोघे सदर ठिकाणी आलेले असताना महसूल विभागाचे अधिकारी हद्द कायम करत असताना शेजारी जमिन असलेले विलास दंडवते तेथे येत आम्हाला मोजणी मान्य नसल्याचे सांगू लागले , दरम्यान महसूलचे अधिकारी त्यांचा जबाब घेत असताना काही युवक सदर ठिकाणी आले त्यांनी गणेश पवार व महेश गलांडे या दोघांना शिवीगाळ , दमदाटी करत हाताने व लाथाबुक्य्यांनी तसेच लोखंडी गज व काठीने म...

सणसवाडीतून कंपनीच्या बांधकाम साहित्याची चोरी.

समर्थ भारत वृत्तसेवा   शिक्रापूर , ता. २६:   सणसवाडी (ता. शिरुर) येथे ड्यूरो शॉक्स  कंपनीच्या बांधकाम सुरु असेलल्या ठिकाणहून रात्रीच्या सुमारास चार अज्ञात युवकांनी काही मशिनरी व साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                सणसवाडी येथे ड्यूरो शॉक्स  कंपनीच्या बांधकाम सुरु असल्याने सदर ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले असल्याने २५ एप्रील रोजी रात्रीच्या सुमारास चार युवक सदर ठिकाणी असल्याचे सुरक्षा रक्षक ओम शिंदे व अनिल राठोड यांना दिसले त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या युवकांना आवाज दिला असता ते पळून जावू लागल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चारही युवक अंधारात पळून गेले.   सुरक्षा रक्षकांनी कंपनीतील सर्व साहित्यांची पाहणी केली असता बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचे केबल , मशीन असे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले , याबाबत ओम मारुती शिंदे वय १९ वर्षे रा. सणस...

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा : वळसे पाटील

समर्थ भारत वृत्तसेवा मंचर , ता. २६:   मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करत असताना माजी गृहमंत्री दिलीपराव पाटील यांनी माजी सभापती देवदत्त निकम यांच्यावर टीका टाळत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.   मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर माजी सभापती देवदत्त निकम यांनी इतर नाराज उमेदवारांना सोबत घेत स्वतंत्र पॅनल उभे करत थेट महाविकास आघाडीलाच आव्हान दिले होते. यानंतर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी देवदत्त निकम यांचे पक्षातून निलंबन करणार असल्याचे म्हटले होते. परंतु देवदत्त निकम यांना निलंबित करून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होणारे नुकसान आणि भविष्यातील आवाहन याचा विचार करून पक्षाने तूर्तास निलंबन टाळले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मेळाव्याला बाज...