पेठ प्रतिनिधी:
पारगाव तर्फे खेड गावामध्ये गायरान क्षेत्रावर फोर्टीन ट्रीज संस्था वेताळे, मार्फत जवळपास १०,००० झाडांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी खड्डे घेण्याची सुरुवात आज करण्यात आली. सदर झाडे लागवडी बाबत पर्यावरण जागर प्रतिष्ठान संस्थेचे माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी सरपंच सचिन पानसरे यांनी वृक्ष लागवडी संबंधी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
यावेळी फोर्टीन ट्रीजचे अनंत तायडे साहेब यांनी, झाडांचे महत्त्व विशद केले व संस्था झाडे लावून तीन वर्षापर्यंत जपवणूक करेल व त्याचे सर्व उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळेल असे सांगितले. सदर प्रसंगी पर्यावरण जागर मंच संस्थेचे सचिव राजन जांभळे यांनी गावकऱ्यांकडून वृक्ष प्रतिज्ञा म्हणून घेतली.
कार्यक्रमामध्ये बाळासाहेब गवते (सेवानिवृत्त वनाधिकारी) व एकनाथ वाळुंज (सेवानिवृत्त बँक अधिकारी) यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमास सरपंच सचिन पानसरे, सरपंच सुदाम जिजाबा पठारे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश अभंग, प्रशांत किसन आचार्य, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दशरथ पवार, गणेश गोविंद सावंत, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती राहुल
मनकर, शिवाजी मनकर, संदीप मनकर, भालेराव , बजरंग बोरकर व बहुसंख्य ग्रामस्थ
उपस्थित होते.
आम्हां पारगावकर नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचे महत्व पटले असून जास्तीत जास्त झाडे लावून त्याची १००% जपवणूक केली जाईल. गावचा प्रत्येक नागरिक यासाठी झटून प्रयत्न करेन व यशस्वी होईल. (नंदा पानसरे, सरपंच, पारगाव तर्फे खेड.)