समर्थ भारत वृत्तसेवा
टाकळ, हाजी, ता.
२८: टाकळी
हाजी (ता. शिरुर) येथील उचाळे वस्ती येथे जमिनीच्या वादातून महिलेला घरात घुसून
मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आकाश वाघमारे, रेखा वाघमारे, सपना आकाश वाघमारे व आशा बाळू साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
टाकळी हाजी येथील उचाळे वस्तीत राहणाऱ्या नयना गायकवाड व आकाश वाघमारे यांच्यात जमिनीचा वाद सुरु असून नयना गायकवाड या घरात स्वयंपाक करत असताना आकाश वाघमारे हा काही महिलांसह गायकवाड यांच्या घरात घुसला दरम्यान सर्वांनी नयना यांना शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली तर घरात आलेल्या महिलांनी नयना यांच्या अंगावर मिरची पूड टाकत त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर आकाश याने लोखंडी गजाने नयना यांना मारहाण केली. याबाबत नयना राहुल गायकवाड (वय ३२ वर्षे) रा. टाकळी हाजी उचाळे वस्ती ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी आकाश वाघमारे, रेखा वाघमारे, सपना आकाश वाघमारे व आशा बाळू साळवे सर्व (रा. टाकळी हाजी उचाळे वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे करत आहेत.